आवृत्ती पुणे

सासरच्या मंडळींनी अपमान केल्याने पतीची गळफास घेऊन आत्महत्या

गोखलेनगरमधील घटना : ‘आई, बाळाची काळजी घे’ अशी चिठ्ठी लिहून ठेवली पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क गोखलेनगरमध्ये रविवारी सायंकाळी किरकोळ वादातून कुटुंबातील सदस्यांनी पत्नीला टॉयलेट क्‍लीनर पाजल्याचे समोर आले. घटनेनंतर रुग्णालयात जाऊन पत्नीला पाहण्यासाठी गेला असता सासरच्या मंडळींनी अपमान केला. त्यामुळे त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी आईला ‘बाळाची काळजी घे’ असे चिठ्ठीत … Read more

मागिल आठ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा पोलिसांच्या जाळ्यात

युनिट-४ची कारवाई : कोंढव्यातील गोडावून फोडून मूळ गावी बिहारमध्ये गेला होता पळून पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क मागिल वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस युनिट-४च्या पथकाने पिंपळे सौदागर येथील कृष्णा चौकात सापळा रचून जेरबंद केले. मागिल आठ वर्षांपूर्वी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत गोडावून फोडून बिहारमध्ये पळून गेला होता. दयानंद झा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव … Read more

अग्निशस्त्र बाळगणारा पोलिसांच्या जाळ्यात

खंडणीविरोधी पथक-२ची कारवाई : चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : वानवडीतील फातिमानगर रस्त्यावरील चहाच्या दुकानासमोर अग्निशस्त्र बाळगणाऱ्यास खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले. खंडणीविरोधी पथक-२ने ही कारवाई केली. एकूण चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोयत्याने सपासप वार करून खुनाचा प्रयत्न करणारे पाच जण जेरबंद

बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई : एक आरोपी दोन वर्षांसाठी होता तडीपार महाराष्ट्र ३६० न्यूज बिबवेवाडी (अप्पर इंदिरानगर) परिसरात युवकाच्या डोक्यावर सपासप वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यां पाच जणांना बिबवेवाडी पोलिसांनी २४ तासांत जेरबंद केले. त्यांच्याकडून हत्यारे जप्त केली असून, त्यातील एक आरोपी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार असल्याने पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांनी तपासाची चक्रे … Read more

कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे दोघे जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी- हातात कोयते नाचवीत दहशत पसरविली महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : पूर्वीच्या भांडणाच्या वादातून लोखंडी कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी दोघांना अटक केली असून, उर्वरित फरार आरोपींचा पोलीस तपास करीत आहेत. आंबेगाव खुर्द येथील जांभुळवाडी रोडजवळील समृद्धी लेक शायर सोसायटीसमोर ही घटना रविवारी (दि. २२ ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. … Read more

गोडाऊनमधील माल स्क्रॅपमध्ये विकणारा पोलिसांच्या जाळ्यात

युनिट-४ची कारवाई : आठ वर्षांपासून पोलिसांना देत होता गुंगारा महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : कोंढवा परिसरातील पत्रा, वायर, तेलाच्या गोडाऊनमधील मालाची चोरी करून विक्री करणाऱ्या एका चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनीट-४च्या पथकातील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीविरुद्ध आठ गुन्हे दाखल असून मागील आठ वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. दयानंद झा (वय 42, रा. चिखली, मुळ रा. … Read more

बनावट आधार कार्ड बनवणारा आणि मोबाईल चोराला ठोकल्या बेड्या

समर्थ पोलीस स्टेशनचा डबल धमाका कामगिरी- आरोपीला घेतले राहत्या घरातून ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : समर्थ पोलीस ठाण्याच्या पथकाने बनावट आधार कार्ड बनविणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद केले. तसेच दुसऱ्या एका कारवाईत मोबाईल चोरालाही अटक केली. गुरुवारी (दि.20 ऑगस्ट) समर्थ पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखल गुन्हयातील आरोपीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व पांढऱ्या … Read more

धनकवडीत बंद सदनिका फोडून पाच लाख ८० हजारांच्या ऐवजाची चोरी

महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : धनकवडीमधील बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्याने कपाटातील ८० हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख ८० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवरु गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सुभाष कारके (वय ४९, रा. धनकवडी, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, … Read more

दुचाकीच्या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू

विमाननगरमधील घटना : अपघातानंतर दुचाकीचालक गेला पळून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एअरपोर्ट रोडवर पादचाऱ्यास दुचाकी जबर ध़डक बसून अपघात झाला. या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. रविवारी (दि. २२ ऑगस्ट) दुपारी साडेबाराच्या सुमारास ५०९ चौकाजवळील नर्सरीसमोर एअरपोर्ट रोडवर ही घटना घडली. अपघातानंतर दुचाकीचालक पळून गेला. बसुराज भिमाशंकर आरेनोर (वय ४९) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे … Read more

कोयत्याने हल्ला करणाऱ्यासह दोन विधिसंघर्षित बालके ताब्यात

खडकी पोलीस स्टेशनची कारवाई – खुन्नसने का पाहतो म्हणत घेराव घालून केली मारहाण महाराष्ट्र ३६०न्यूज नेटवर्क पुणे : खुन्नसने का पाहतो, आम्ही चांदणे गँगचे भाई आहोत, असे म्हणत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करणाऱ्यासह दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. कसाई मोहल्ला, खडकी येथे २१ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. याप्रकरणी साहिल ऊर्फ भिंगरी खान (वय १९ (रा. … Read more