आवृत्ती पुणे

पोलीस निरीक्षकावर पुण्यानंतर सोलापूरमध्ये विनयभंगाचा गुन्हा

पुण्यातील गुन्हा मिटविण्यासाठी दिली जीवे मारण्याची धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षकाने त्याच्या राहत्या घरी एका महिलेला बोलावून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी सोलापूरमधील विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील जुना गुन्हा मिटवून घेण्यासाठी पोलीस निरीक्षकाने त्या महिलेला घरी … Read more

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग

विश्रामबाग पोलिसांत गुन्हा : शास्त्री रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे खळबळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फर्ग्युसन महाविद्यालय परिसरातील हेअर स्पामध्ये तरुणीचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी पुण्यातील सदाशिव पेठेत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थीनीचा भररस्त्यात विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.10) सकाळी अकराच्या सुमारास शास्त्री रोड परिसरात घडली. नवी पेठत राहणाऱ्या … Read more

टीईटी परीक्षा गैरव्यवहारातील सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा : अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेत गैरव्यवहार प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. जीए सॉफ्टवेअर कंपनीचा व्यवस्थापक अश्विनकुमार शिवकुमार याने पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोठा खुलासा केला आहे. शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर याने सुमारे पाच कोटी रुपये दिल्याचे अश्विनकुमारने पोलिसांना सांगितल्याची … Read more

भिलारेवाडी येथे पहाटे बस उलटली !

चालकासह चार जखमी; दैव बलवत्तर म्हणून बचावलो प्रवाशांची भावना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे-सातारा महामार्गावर जुन्या कात्रज घाटातील भिलारेवाडी येथे तीव्र वळणावर पहाटेच्या सुमारास १९ प्रवाशांना घेऊन जाणारी कर्नाटक पासिंगची बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटून गंभीर अपघात घडला. यामध्ये चालकासह चार जण जखमी झाले आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटक राज्यातील … Read more

सुखसागरमध्ये अटल बससेवा सुरु

ज्येष्ठ नगरसेविका रंजना टिळेकर यांच्या हस्ते बस सेवेचे उदघाटन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे: अप्पर इंदिरा,सुखसागर नगर मधील नागरिकांना कात्रजमध्ये येण्यासाठी सरळ मार्गे बस उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांची अडचण होत होती. माजी आमदार योगेश टिळेकर यांनी पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कोरोना काळात बंद झालेली “अटल बस” पुन्हा सुरू करवून घेतली आहे. आता या बस सेवेला … Read more

सव्वालाख रुपयांची वायर नेली चोरून

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : अज्ञात चोरट्यावर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दुकानासमोरील पायऱ्यावर ठेवलेल्या एक लाख २० हजार रुपये किमतीची तांब्याची वायर चोरट्याने चोरून नेली. हडपसरमधील यशदीप शॉपिंग सेंटर येथील श्रीनाथ इलेक्ट्रिक दुकानासमोर ६ जानेवारी २०२२ रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. श्रीनाथ घुले (वय ४३, रा. हडपसर, पुणे) यांनी हडपसर … Read more

सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना सायबर चोरट्याचा दणका

चतु:श्रृंगी पोलिसांत फिर्याद : ३ जुलै २०२१ रोजी झाली चोरी, आता गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बँका आणि पोलिसांकडून कोणालाही ओटीपी अथवा आपला गोपनीय क्रमांक सांगू नका असे वारंवार आवाहन केले जात असते. असे असताना एका सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना सायबर चोरट्यांनी केवायसी अपडेटच्या नावाखाली गंडा घातला आहे. हा प्रकार ३ जुलै … Read more

प्रगती फाउंडेशनच्या ‘लसीकरण आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

नगरसेवक प्रकाश कदम : परिसर १०० टक्के लसीकरणयुक्त करण्याचे उद्देश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ‘लसीकरण आपल्या दारी’ या मोहिमेअंतर्गत “प्रगती व्हॅक्सीन एक्सप्रेस” या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. प्रगती फाऊंडेशन आणि बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा लसीकरणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात … Read more

गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणारे दोघे जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : पाऊण लाखाचे आठ मोबाईल केले जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात गर्दीच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दापाश करून पाऊण लाख रुपयांचे आठ मोबाईल जप्त करण्यात आले. खराडी, चंदननगर येथे गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने ही दमदार कामगिरी केली. मुकेश शिवलाल दिवाकर (वय २१, रा. यशवंतनगर, जुने साईबाबा मंदिरामागे, खराडी, … Read more

ब्लेडने वार करून मारहाण करणारा जेरबंद

स्वारगेट पोलिसांत फिर्याद : जेधे चौकात ९ जानेवारी २०२२ रोजी घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून ब्लेडने वार करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्यास अटक केली असून, एका फरारीवर गुन्हा दाखल केला आहे. स्वारगेट येथील जेधे चौकात ९ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान ही घटना घडली. … Read more