
CBSE 10th Result 2021: सीबीएसई 10 वी बोर्ड रिजल्टची मोठी आपडेट, माहाती घ्या.
नवी दिल्ली: निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजेच सीबीएसई दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.(CBSE Class 10th Result) मिळालेल्या माहिती नुसार सीबीएसई दहावी बोर्डाचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याच्या कामात व्यस्त आहे. जर सर्व काही ठीक झाले तर पुढील एक ते दोन दिवसांत सीबीएसई दहावीचा बोर्ड निकाल जाहीर करेल.
95% पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी रेफरेंस वर्षापेक्षा अधिक असू शकत नाहीत.
सीबीएसईच्या (CBSE)नव्या सूचनांनुसार, संदर्भ वर्षात चार विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले तर या वर्षीही शाळा फक्त चार विद्यार्थ्यांना इतके गुण देऊ शकेल. 2020-21 चे संदर्भ वर्ष शेवटची तीन वर्षे म्हणजेच 2017-18, 18-19 आणि 19-20 मानले जाईल.
कोणती ही शाळा मंडळाच्या नियमांचे पालन न केल्यास मंडळ आपोआपच विद्यार्थ्यांचे गुण कमी करेल.
दहावीचा आणि बारावी निकाल या आठवड्यात 31 जुलै रोजी जाहीर होऊ शकेल.
मंडळाच्या (board) मते, संदर्भ वर्ष नियम फक्त 96, 97, 98, 99 आणि 100 गुण देण्यास लागू असेल. खरं तर बर्याच शाळांनी चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना 95-100 टक्के गुण दिले होते, ज्या मुळे निकाल जाहीर होण्यास विलंब होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, दहावीचा निकाल या आठवड्यात आणि 12 वीचा निकाल 31 जुलै रोजी जाहीर केला जाऊ शकतो.