आवृत्ती , पुणे

बार्शी पोलिसांची नाकाबंदी; गावठी पिस्तूल, तलवार अन् चाकूसह सराईत ताब्यात

५ लाखांच्या कारसह ५.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त; तडीपार कालावधी नुकताच संपलेल्या आरोपीवर कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या आदेशानुसार बार्शी शहरात सुरू असलेल्या नाकाबंदी व कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान बार्शी शहर पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरुद्ध मोठी कारवाई केली. पोलिसांनी एका सराईत आरोपीकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, लोखंडी तलवार, धारदार चाकू तसेच स्विफ्ट डिझायर कार असा एकूण … Read more

सिंहगडावर मारहाण करणाऱ्या समस्त हिंदू बांधव आर्मीच्या ८ जणांवर गुन्हा दाखल

८ वर्षाच्या मुलीने बरमुडा घातल्याने वडिलांना केली मारहाण : अन्य तरुणतरुणींही केली मारहाण महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ८ वर्षांच्या मुलीने अजय देवगण यांचा ‘तानाजी’ हा चित्रपट पाहिला होता. तिने सिंहगड किल्ला व तानाजींचा पुतळा पाहण्याचा हट्ट केला. त्यामुळे या मुलीला घेऊन एक कुटुंब सिंहगडावर आले होते. या मुलीने बरमुडा घातला असल्याच्या कारणावरून तिच्या वडिलांना … Read more

घरातून बेकायदेशीर सव्वा लाखांचा दारूचा साठा जप्त

सिंहगड रोडवरील हिंगणे खुर्द येथील घटना : गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घरामध्ये बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारूचा साठा करून त्याची विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने हिंगणे खुर्द येथील साईनगरमधील घरावर छापा टाकून १ लाख २४ हजार ६३५ रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे. … Read more

ज्येष्ठ महिलेवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

साडेपाच लाखांचे दागिने नेले चोरुन : खडक पोलिसांनी दोघांना केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नातेवाईक असलेल्या व्यक्तीने व्यवसायासाठी ज्येष्ठ महिलेकडे १ लाख रुपये मागितले. त्यांनी नकार दिल्याच्या रागातून चाकूने हात, मनगट आणि गळ्यावर वार करून ज्येष्ठ महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या आरोपीने कानातील सोन्याचे वेल जबरदस्तीने ओढून काढल्याने कानाला दुखापत झाली. तसेच … Read more

बार्शीच्या सुनेची MPSC मध्ये बाजी; भूमिका कानडे दुय्यम निबंधकपदी

मंत्रालयातील सहायक कक्ष अधिकारी पदावरून श्रेणी-१ पदापर्यंत झेप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या निकालात बार्शीच्या यशाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. बार्शीचे सुपुत्र ऋतिक आगरकर यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवून बार्शीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याचबरोबर बार्शीच्या सुनेनेही MPSC परीक्षेत उल्लेखनीय यश … Read more

MPSC मध्ये बार्शीचा डंका, ऋतिक आगरकर राज्यात प्रथम

एकाचवेळी तीन शासकीय पदांवर निवड : दुय्यम निरीक्षक (ग्रेड-१), राज्यकर निरीक्षक अन् सहायक कक्ष अधिकारीपदी यश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शीच्या शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील यशस्वी परंपरेत आणखी एका मानाच्या अध्यायाची भर पडली आहे. बार्शीचे सुपुत्र ऋतिक मुकुंद आगरकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावत बार्शीचे नाव राज्याच्या … Read more

आनंद दरबार येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या फियोना भन्साळी व विहंग शेडगे यांचा सन्मान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दत्तनगर-कात्रज येथील आनंद दरबार येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्तींच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी स्वातंत्र्यसैनिक, जवान तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन केले. कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय … Read more

वर्धमानपुरा सोसायटीची डिजिटल झेप; ३३५ सदनिकांचे रेकॉर्ड होणार डिजिटल

स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘डिजिटल प्रॉपर्टी रेकॉर्ड व डिजिटल प्रमाणपत्र’ उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुण्यातील ३३५ सदनिका असलेल्या वर्धमानपुरा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने डिजिटल, सुरक्षित आणि भविष्यासाठी सज्ज सोसायटीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. सोसायटीतील प्रत्येक सदनिकेशी संबंधित महत्त्वाची माहिती व रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवण्यासाठी ‘डिजिटल प्रॉपर्टी रेकॉर्ड व डिजिटल प्रमाणपत्र’ उपक्रमाचा … Read more