आवृत्ती , पुणे

घोरपडे पेठ पोलीस चौकीजवळ गोळीबार

तरुणाच्या पाठीत गोळी शिरली : एकाला जागेवरच पकडले, पूर्ववैमनस्यातून घडली घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून घोरपडे पेठ पोलीस चौकीजवळ शुक्रवारी भरदिवसा गोळीबाराची घटना घडली. या घटनेत एक तरुण जखमी झाला असून त्याच्या पाठीत गोळी शिरली आहे. ख्वाजाउद्दीन नाजीर शेख ऊर्फ नूर शेख (रा. गणेश पेठ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला तातडीने … Read more

‘डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ९४ लाखांची फसवणूक

५५ वर्षीय नोकरदाराला गंडा : सायबर पोलिसांनी दाखल केला गुन्हा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ‘डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका नोकरदाराची ९४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कल्याणीनगर येथील एका ५५ वर्षीय नोकरदाराने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी … Read more

एसटी बँकेच्या संचालकाला ४ लाखांची लाच घेताना अटक

लाच लुचपत ची बारामतीत कारवाई : बिलाच्या मंजुरीची ऑर्डर देण्यासाठी मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एसटी बँकेच्या बारामती शाखेतील फर्निचर नूतनीकरणाच्या कामाचे उर्वरित बिल देण्यासाठी सुरुवातीला ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत त्याने ६ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ४ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना … Read more

लक्ष्मी फुड, सुदामाचे पोहेच्या मालकांविरुद्ध गुन्हे दाखल

कामगार उपायुक्त कार्यालयाची कारवाई : बाल कामगारांना कामावर ठेवल्याप्रकरणी कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कसबा पेठेतील प्रसिद्ध सुदामाचे पोहे आणि लक्ष्मी फुड या दोन आस्थापनांमध्ये १४ वर्षांखालील अल्पवयीन मुलांना कमी वेतनावर दररोज ८ ते १० तास कामावर ठेवून त्यांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा प्रकार कामगार उपायुक्त कार्यालयाच्या विशेष तपासणी मोहिमेत उघडकीस आला … Read more

नशेसाठी इंजेक्शनच्या १०० बाटल्या बाळगणाऱ्या दोघांना अटक

मिशन क्रॅकडाऊनच्या विशेष पथकाची कामगिरी : बडोद्याहून कुरिअरने मागवल्या बाटल्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा साठा बाळगणाऱ्या दोघांना मिशन क्रॅकडाऊनच्या विशेष पथकाने अटक केली असून, त्यांच्याकडून MAPHENTERMINE SULPHATE INJECTION IP (TERMIVA) या गुंगीकारक औषधाच्या १०० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. सुरज पद्माकर भुते (वय १९, रा. जगताप वस्ती, वाघोली, मूळ रा. … Read more

तरुणाचे अपहरण करून बहिणीच्या घरात केले बंदिस्त

काळेपडळ पोलिसांची तत्काळ कारवाई : एका गुंडाला अटक, चौघे फरार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भावाने पिस्तूल चोरून गावाला पळून गेल्याच्या संशयावरून काही गुंडांनी एका तरुणाचे अपहरण करून त्याला बहिणीच्या घरी नेऊन बंदिस्त केले. दरम्यान, भाचीने प्रसंगावधान राखत घरातून बाहेर पडून ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन केला. माहिती मिळताच काळेपडळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबाची … Read more

विक्रीसाठी आणलेल्या दोघांकडून मांडूळ जप्त

फुरसुंगी पोलिसांची कारवाई : दिवे घाट पायथ्यावरील वडकी नाला परिसरातून ताबा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दिवे घाटाच्या पायथ्याजवळ दोघेजण मांडूळ साप विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती फुरसुंगी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून सुमारे १ लाख रुपये किमतीचा मांडूळ जप्त केला. प्रथमेश सुरेश चव्हाण (वय १९, रा. जगतापनगर, सोनके, … Read more

दानवीर सुभाषचंद्र खाबिया के संथारा की पूर्णाहुति

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन समाज के लिए अत्यंत श्रद्धा और आध्यात्मिक भावनाओं से जुड़ा एक मार्मिक प्रसंग गुरुवार, 23 जुलाई को संपन्न हुआ। आदरणीय सुभाषचंद्र सुखलालजी खाबिया (78 वर्ष) की संथारा पूर्णाहुति आज दोपहर 1:00 बजे हुई। उल्लेखनीय है कि स्वर्गीय सुभाषचंद्रजी खाबिया ने बुधवार, 15 जुलाई 2026 को परिवारजनों की उपस्थिति में … Read more

२१ बांधकाम व्यावसायिक, जागा मालकांवर गुन्हा दाखल

पीएमआरडीए, महापालिकेची बनावट कागदपत्रे जोडली : २२ खरेदी दस्तांची नोंदणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मिळकतीबाबत बनावट पीएमआरडीए विकास परवानगी, प्रारंभ प्रमाणपत्र, भोगवटा पत्र तसेच महापालिकेची बनावट कागदपत्रे जोडून २२ बनावट खरेदीखत दस्तांची नोंदणी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी २१ बांधकाम व्यावसायिक व शेतमालकांविरुद्ध सह दुय्यम निबंधकांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सह … Read more