आवृत्ती , पुणे

ट्रकच्या धडकेत ३ महिला वारकरी ठार

मृत महिला मिरज तालुक्यातील : वाहनांसाठी राखीव रस्त्यावरून जात होत्या महिला वारकरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सासवडहून जेजुरीच्या दिशेने जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पुढे असलेल्या दिंडीतील महिलांना वारीतील ट्रकने धडक दिली. या अपघातात ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून, ४ महिला वारकरी जखमी झाल्या आहेत. वाहनांसाठी राखीव असलेल्या उजव्या बाजूच्या रस्त्यावरून वारकरी … Read more

बार्शी शहर डीबी पथकाची धडक कारवाई

आठवडा बाजारातील मोबाईल चोरणारी बीडची टोळी तासाभरात जेरबंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने (डीबी पथक) उल्लेखनीय कामगिरी करत शनिवार आठवडा बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला अवघ्या एका तासात जेरबंद केले. आरोपींकडून चोरीस गेलेले चारही मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, एकूण ₹४५ हजारांचा मुद्देमाल जप्त … Read more

मानवतेचा जिवंत संदेश! मुथ्था परिवाराची नारायणगावकरांना विनामूल्य ‘शीत शवपेटी’ची भेट

अंतिम क्षणीही सन्मान जपण्याचा संवेदनशील उपक्रम : गरजू नागरिकांसाठी सेवा पूर्णपणे मोफत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नारायणगाव : सामाजिक बांधिलकी जपत दुःखाच्या प्रसंगी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा आदर्श नारायणगावातील मुथ्था परिवाराने पुन्हा एकदा घालून दिला आहे. स्व. दादी रखमाबाई नंदरामशेठ मुथ्था यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नारायणगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते हर्षल मुथ्था, सुयोग मुथ्था आणि समस्त मुथ्था … Read more

सासवड–जेजुरी मार्गावर भीषण अपघात

भरधाव ट्रक दिंडीत घुसला : तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू, चार जणी गंभीर जखमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आषाढी वारीदरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सोमवारी सकाळी सासवड–जेजुरी मार्गावर अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. सासवडहून जेजुरीकडे प्रस्थान केलेल्या पालखीसोहळ्यात भरधाव ट्रक दिंडीत घुसल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. … Read more

ए रायझिंग सायन प्रीस्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर अरहम फाउंडेशन संचालित ए रायझिंग सायन प्रीस्कूलमध्ये पारंपरिक पालखी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात चिमुकल्या बालवारकऱ्यांनी त्यांच्या माता व आजींसह पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग गायन, भजन आणि दिंडी काढून महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा अनुभव लहानग्यांनी घेतला. या उपक्रमातून … Read more

रागाच्या भरात पतीने घराला लावली आग

अनैतिक संबंधाबाबत पत्नीने विचारला जाब : घरगुती साहित्याबरोबर ३ मांजरींचा मृत्यू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अनैतिक संबंधाबाबत पत्नीने जाब विचारल्याच्या रागातून पतीने स्वतःच्या घराला आग लावली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले, तसेच पाळलेल्या तीन मांजरींचा होरपळून मृत्यू झाला. पर्वती पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दयानंद अनंता कसबे (वय ३८, रा. सावित्रीबाई … Read more

ज्येष्ठांच्या देखभालीसाठी घरगडी ठेवताय?

शुश्रृषा करण्यासाठी ठेवलेल्याने ३० लाखांचे दागिने केले लंपास : डेक्कन पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घरातील दोघेही कामानिमित्त घराबाहेर पडत असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी अनेक जण मेड किंवा घरगडी ठेवतात. ज्येष्ठांची शुश्रूषा करण्यासाठी ते दिवसभर घरीच असतात. अशावेळी घरातील उघड्यावर ठेवलेले दागिने, रोकड पाहून त्यांच्या मनात लालसा निर्माण होऊन ते चोरी करत … Read more

बार्शीत आज ‘स्वास्थ्य-संवाद’ कार्यक्रम, तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन

कॅन्सर, हृदयरोग, बीपी, शुगरसह निरोगी जीवनशैलीवर होणार सविस्तर संवाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शीकर नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आज (शनिवार) सायंकाळी ५ वाजता मोरया फंक्शन हॉल, बार्शी येथे ‘स्वास्थ्य-संवाद’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास बार्शीचे तहसीलदार एफ. आर. शेख, आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी आणि बार्शी नगरपालिकेचे … Read more