आवृत्ती , पुणे

सूर्यदत्त हॉस्पिटॅलिटी कॉलेजची उत्कृष्ट दर्जाची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप व प्लेसमेंट

देश-विदेशातील आघाडीच्या हॉस्पिटॅलिटी ब्रँड्समध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी : गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम (SCHMTT) ने यंदाही १०० टक्के राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप आणि प्लेसमेंटचा मानाचा टप्पा गाठला आहे. संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित हॉस्पिटॅलिटी … Read more

मोशीत भीषण दुर्घटना : कचऱ्याचा डोंगर कोसळला

23 जण अडकल्याची शक्यता, 14 जणांची सुटका, 9 जणांचा शोध सुरू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात बुधवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. अनेक वर्षांपासून साचलेल्या ‘लेगसी वेस्ट’च्या प्रचंड ढिगाऱ्याचा भाग मुसळधार पावसामुळे अचानक घसरला आणि अवघ्या काही क्षणांत तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. घटनेच्या … Read more

५ महामार्ग पोलीस वॉर्डनना अटक

मिसिंग लिंक वर दरड कोसळली असताना ५ लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे–मुंबई महामार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण प्रशासन अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत असताना, त्याचवेळी लोणावळ्याकडे जाणाऱ्या एका कारचालकाला अडवून त्याच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक … Read more

तरुणांना लुबाडणारे दोन पोलीस अंमलदार निलंबित

लक्ष्मी रोडवर रात्री नाकाबंदीत वाटमारी करून तरुणांना अटकेची भीती दाखवुन खंडणी उकळली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लक्ष्मी रोडवरील विजय मारुती चौकात नाकाबंदी सुरू असताना रस्त्याने जाणाऱ्या तिघा तरुणांना अडवून अटकेची भीती दाखवत त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या फरासखाना पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस अंमलदारांना पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी निलंबित केले आहे. राहुल सुधाकर दाभाडे आणि विवेक … Read more

ताम्हिणी ५२५, लोणावळा २७९, भिरा ५७४ मिमी पाऊस

लोणावळा परिसरात सर्वत्र अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीला महापूर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आळंदीमधून बुधवारी माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्याचवेळी लोणावळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. या महापुराचे सावट पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावर पडले आहे. राज्यातील विविध भागांतून आलेल्या हजारो वारकऱ्यांना आळंदीत पोहोचणे कठीण झाले आहे. लोणावळा येथे गेल्या … Read more

शिष्यवृत्तीत सुलाखे हायस्कूल बार्शीची यशस्वी घोडदौड

गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सुलाखे हायस्कूल, बार्शी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी … Read more

खडकवासला धरणातून २७ हजार २०० क्युसेक पाण्याचा नदीत विसर्ग

ओंकारेश्वर मंदिरात शिरले पुराचे पाणी : सिंहगड रोडवरील एकतानगरीत पाणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरले असून मध्यरात्री १२ वाजल्यापासून धरणातून नदीपात्रात विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली. सकाळपासून २७ हजार २०० क्युसेक इतके पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असून मुठा नदीला पूर आला आहे. ओंकारेश्वर मंदिरात पुराचे … Read more

पालखी सोहळ्यात यंदा ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर

पालखी सोहळ्यासाठी पोलीस सज्ज : सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रतिवर्षाप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन गुरुवारी (९ जुलै) शहरात होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी सात हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. यंदा पालखी मार्गावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात … Read more

व्यावसायिकाकडे बिष्णोई गँगच्या नावाने खंडणी मागणारे जेरबंद

५० कोटींच्या खंडणीची मागणी करून केला होता गोळीबार : हरियाणा, राजस्थानमधून अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिष्णोई गँगच्या नावाने व्यावसायिकाकडे ५० कोटी रुपयांची खंडणी मागून त्यानंतर त्यांच्या कंपनीच्या गेटवर चार गोळ्या झाडून दहशत निर्माण करणाऱ्या चार जणांना गुन्हे शाखेच्या पथकांनी राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधून अटक केली आहे. पवन प्रकाशराम बारड (वय २४, रा. हनुमानगढ … Read more