आवृत्ती , पुणे

बार्शीत हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांचा धडक छापा; ४ जणांवर गुन्हे

३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त : ७१० लिटर रसायन व दारू जागीच नष्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत बार्शी शहर पोलिसांनी गुरुवारी (दि. ५) शहरातील विविध भागांत धडक कारवाई करत अवैध हातभट्टी दारू निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत चार आरोपींविरुद्ध गुन्हे … Read more

मौजमजेसाठी सायकल चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात

१ लाख रुपयांच्या १५ सायकली जप्त : वडील, आजोबा तुरुंगात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आईचे निधन झालेले, वडील व आजोबा गंभीर गुन्ह्यात येरवडा तुरुंगात असलेले आणि आजीबरोबर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचा सांभाळ करायला कोणी नसल्याने त्याने मौजमजेसाठी सायकली चोरण्यास सुरुवात केली. अशा सायकलचोर अल्पवयीन मुलाला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख रुपयांच्या १५ … Read more

सायबर चोरट्यांनी तिघांची केली ७६ लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमधून जादा परतावा देण्याचे आमिष : ऑनलाईन गुंतवणुकीतील वाढता धोका महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सायबर चोरटे कोणत्याही शेअरमध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक करत नाहीत. ते केवळ अॅपवर फायदा झाल्याचे दर्शवितात, हे अनेकदा समोर आले असतानाही ज्या व्यक्तीला कधी भेटले नाही, त्याचे कार्यालय कोठे … Read more

गॅसचा स्फोट होऊन तिघे गंभीर जखमी

खराडीतील खांदवेनगरमधील घटना : गॅस सिलेंडर बदलताना झाली होती गळती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गॅस सिलेंडर बदलत असताना सिलेंडरमधून गॅसची गळती होऊन घरात स्फोट झाल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले असून महिलेसह ५ वर्षांची मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. ही घटना खराडीतील खांदवेनगर येथील फॉर्च्युन सिटी सोसायटीतील एका घराच्या पहिल्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी सव्वानऊ वाजता … Read more

६ मोक्का गुन्हे असलेल्या वाँटेड सचिन घायवळला अटक

राजस्थानमधील सीकर येथून केला जेरबंद : ९ महिने देत होता गुंगारा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोथरुडमध्ये गोळीबार करून दहशत निर्माण केल्यानंतर गेल्या सप्टेंबरपासून फरार असलेल्या गँगस्टर नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने राजस्थानमधील सीकर येथून जेरबंद करण्यात यश मिळवले. सचिन बन्सीला घायवळ (वय ४८, रा. संत ज्ञानेश्वर … Read more

महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता लाच घेताना अटक

नवीन वीज मीटरसाठी प्रती मीटर मागितली १ हजारांची लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नवीन वीजमीटरसाठी प्रतिमीटर १ हजार रुपयेप्रमाणे १२ मीटरसाठी १२ हजार रुपयांची लाच मागून, त्यापैकी ४ हजार ५०० रुपये आधी घेऊन उर्वरित ७ हजार ५०० रुपये स्वीकारताना हडपसर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा … Read more

वेगवेगळ्या टूरचे आमिष दाखवून १५ लाखांना गंडा

भारतत्व टुरिझम सर्व्हिसेसचा चालक कार्यालय बंद करून फरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : थ्री सिस्टर्स टूरचे आयोजन करून देतो, असे सांगून वेगवेगळ्या ग्रुपकडून १५ लाख ३७ हजार ५५० रुपये घेऊन कार्यालय बंद करून भारतत्व टुरिझम सर्व्हिसेसचा मालक फरार झाल्याचे समोर आले आहे. जयदीप श्रीरंग काशीकर (रा. ग्रीन लीप सोसायटी, किरकटवाडी) असे भारतत्व टुरिझम सर्व्हिसेसच्या मालकाचे … Read more

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

अधिक मासात सोन्याची अंगठी न दिल्याने केला होता छळ : चंदननगर पोलिसांनी पतीला केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अधिक मासानिमित्त जेवायला बोलावून सोन्याची अंगठी देण्यास नकार दिल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. तेजस्विनी गोरख सोनवणे (वय २५, … Read more

१२ वी पास गिरी करत होता गर्भलिंग निदान चाचणी

वाघोलीतील गुन्ह्यातील आरोपींचा सहभाग : यवत गर्भलिंग निदान चाचणी प्रकरण महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अण्णासाहेब गिरी हा १२ वी पास असून त्याने बी. फार्मसीसाठी प्रवेश घेतला होता. मात्र, त्याने ते शिक्षण पूर्ण केले नाही. आयुर्वेदिक डॉक्टरकडे एम.आर. म्हणून काम केल्याच्या जोरावर त्याने अवैधरित्या गर्भलिंग निदान चाचणी करण्यास सुरुवात केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तो … Read more