आवृत्ती , पुणे

जीपॅट परीक्षेत डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे यश

स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा यावर्षीही कायम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : भारत सरकार द्वारे घेतल्या जाणाऱ्या जीपॅट-२०२४ या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेमध्ये आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व याद्वारे स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा यावर्षीही विद्यार्थ्यांनी कायम ठेवली आहे. फार्मसी शिक्षण क्षेत्राच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा अनिवार्य आहे. … Read more

प्रेमिकेच्या मुलावर वार करण्याचा प्रयत्न

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमसंबध तुटल्या नंतर प्रेमिकेला त्रास देणाऱ्या एका युवकाने फिर्यादी महिलेच्या मुलावर वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हडपसर मध्ये बुधवारी भरदिवसा ११:३० वाजता घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने धाव घेत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी ससाणेनगर मधील ३५ वर्षीय … Read more

आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १७ लाखाला गंडा

मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विविध बँकेच्या खातेदारांना आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १७ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार मार्केट यार्ड परिसरात घडला आहे. ३१ मे ते २५ जून या काळात ही घटना घडली आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार संबधित खातेदारांना ऑनलाईन माध्यमाव्दारे व विविध बँक … Read more

बसच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव खासगी बसच्या धडकेने दुचाकीवरील तरुण ठार झाल्याची घटना उबाळे नगर महिंद्रा शो रूमच्या समोर घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात प्रदीप तुकाराम देवकर (वय ४१ वर्षे रा. केसनंद ता. हवेली जि. पुणे.) यांचा मृत्यू झाला आहे. फिर्याद मयत तरुणाच्या आईने लोणीकंद पोलिसात दिली … Read more

वाघोली मारहाणी प्रकरणातील ५ आरोपी ताब्यात

गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वाघोली येथील मारहाण, अपहरण व दरोडयाच्या गुन्हयातील ०५ आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २८ जुलै रोजी वाघोली येथील चोखीदाणी रोडवरील दुर्गामाता मंदिर येथे फिर्यादी हे त्यांचे चुलत भाऊ यांचे सह भाजी खरेदी करण्यासाठी पायी जात … Read more

भवानी पेठेत छापा, जप्त केला १४ लाखांचा गुटखा

खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने भवानी पेठेत छापा टाकून राज्यात प्रतिबंधित असलेला १४ लाख रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. याप्रकरणी कामरान मुर्तुजा खान (२८), अमन मोहंमद इस्लामुद्दीन (३१, दोघेही रा. भवानीपेठ, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांच्याविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

आयुष्यात मनाची शांतता सर्वांत महत्त्वाची : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये सुंदर विचारांचे दर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पाणी खालच्या दिशेने सहजपणे वाहत जाते त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. त्याप्रमाणे आपले मनसुद्धा अशांतीकडे, विकृतींकडे सहजतेने धाव घेते. परंतु त्याला वरच्या दिशेने न्यायचे असेल तर मात्र प्रयत्न करावे लागतात. आयुष्यात मनाची शांतता सर्वांत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी … Read more

चाकणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासनाला आली जाग

उपाययोजनांचा आढावा : नवीन रस्त्यांसह रुंदीकरणासाठी १७९ कोटी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चाकणकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पुण्याच्या जिल्हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनी परिसराची पाहणी करावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. चाकण (ता. खेड) परिसरातील वाहतूक कोंडी समस्येबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबतचा उपमुख्यमंत्री अजित … Read more

भरधाव वाहनाच्या धडकेत केसनंद लोणीकंद रोड एक जण ठार

लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : केसनंद लोणीकंद रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाला. ही घटना २८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये कमलेश शिंदे पोलीस अंमलदार लोणीकंद यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात वाहन चालक धडक दिल्यानंतर पळून गेला आहे. केसनंद … Read more