आवृत्ती , पुणे

अशोक जैन आत्महत्या प्रकरणी चौघांचा जामीन अर्ज फेटाळला

बांधकाम व्यावसायिकाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचा निर्णय; १५ कोटींच्या फसवणुकीचा आरोप महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बांधकाम व्यावसायिक अशोक जैन यांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. कथित आर्थिक फसवणूक, मृताच्या शरीरावरील जखमा, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आणि तपासाची आवश्यकता लक्षात घेता आरोपींना जामीन मंजूर करता येणार नसल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश … Read more

रेड कॉर्नर नोटिसद्वारे बँकॉकहून सायबर चोरट्याला अटक

दुबई व थायलंडमधून चालवत होता आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेट : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची मोठी कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोट्यवधी रुपयांच्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांत २०२४ पासून वॉन्टेड असलेल्या आणि दुबई व थायलंडमधून आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेट चालविणाऱ्या एका सायबर गुन्हेगाराला बँकॉक येथे अटक करून पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिसांनी भारतात आणले आहे. सौरभ ऊर्फ गणेश बाळासो काळे … Read more

मेडिकलला प्रवेश देण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्यास अटक

राज्यातील ४० हून अधिक पालकांना घातला गंडा : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी (एमबीबीएस) प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून राज्यभरातील ४० हून अधिक पालकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया घालविणाऱ्या तेलंगणातील एका संस्थाचालकाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. अरविंद प्रकाशकुमार आरोगोंडा (वय ४७, रा. सिकंदराबाद, … Read more

पिंपळे गुरवच्या वॉर्ड निरीक्षक अभियंत्याला लाच घेताना अटक

बांधकाम पाडण्याची भीती दाखवून मागितली ७० हजारांची लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उच्च न्यायालयाने दंड भरून बांधकाम नियमित करण्याचे आदेश दिलेले असतानाही बांधकाम पाडण्याची भीती दाखवून ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ प्रभागातील वॉर्ड निरीक्षक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. उमेश अरुण लोंढे (वय २८, रा. शिवराजनगर, … Read more

ऑनलाईन गेमिंगमध्ये फसवणूक करणारे कॉल सेंटर उद्ध्वस्त

हडपसर, फुरसुंगीमधील ५ ठिकाणी कारवाई : दररोज शेकडोंची होत होती फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हडपसर व फुरसुंगी येथे बेकायदेशीरपणे चालविण्यात येणाऱ्या कॉल सेंटरवर मुंढवा पोलिसांनी हडपसर व सायबर पोलिसांच्या मदतीने छापा टाकून ही कॉल सेंटर उद्ध्वस्त केली. या ठिकाणाहून बेकायदेशीरपणे कॉल सेंटर चालवून लोकांना ऑनलाईन गेम खेळण्यास प्रवृत्त करून त्यांच्याकडून पैसे ट्रान्सफर करून … Read more

सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल, २ जिवंत काडतुसे जप्त

डेक्कन पोलिसांची कामगिरी : गुंडावर खंडणीसह ५ गंभीर गुन्हे दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगून नदीपात्रात फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला डेक्कन पोलिसांनी पकडून त्याच्याकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. श्रीकांत उर्फ सोन्या संतोष मरळ (वय ३५, रा. पर्वती दर्शन) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी … Read more

पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारीतील गुन्हेगार जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट ६ ची कामगिरी : गुन्ह्यांचे शतक पार केलेल्या अजयसिंग दुधानीकडून पिस्टल, ४ काडतुसे जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा पाठलाग करून गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने तिघांना जेरबंद केले. तर तिघेजण पसार झाले. गुन्ह्यांचे शतक पार केलेल्या सराईत गुन्हेगार अजयसिंग दुधानी याच्याकडून एक … Read more

पूर्ववैमनस्यातून जिम मालकावर गोळीबार

दोन गोळ्या लागल्या, कोयत्यानेही वार : सहकारनगरातील घटना, चौघे ताब्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून जिम मालकावर दुचाकीवरून आलेल्या चौघांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री सहकारनगर येथील बिकानेर चौकात घडली. या हल्ल्यात जिम मालक योगेश बानेकर यांना दोन गोळ्या लागल्या असून हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. सहकारनगर पोलिसांनी या … Read more

एनएसईचे सीईओ आशिष चौहान यांना ‘सूर्यभारत ग्लोबल अवॉर्ड’

सूर्यदत्त ग्रुपतर्फे सन्मान : भारतातील गुंतवणूक संस्कृती लोकाभिमुख करण्यात मोलाचे योगदान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई)चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांना भारतातील आधुनिक भांडवली बाजारपेठ आणि वित्तीय व्यवस्थेच्या उभारणीत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे ‘सूर्यभारत ग्लोबल अवॉर्ड – द फादर ऑफ … Read more