आवृत्ती , पुणे

तरुणावर वार करून खुनाचा प्रयत्न करणारे चौघे जेरबंद

बिबवेवाडी पोलिसांनी ८ तासांत धायरीतून केली अटक : बिबवेवाडी स्मशानभूमीसमोरील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना बिबवेवाडी पोलिसांनी धायरीतून आठ तासांत अटक केली आहे. प्रदीप पिंटू कश्यप (वय १९, रा. शिवतेजनगर, खडके वस्ती), मयूर रोहिदास चव्हाण (वय २०, रा. विघ्नहर्तानगर), तेजस सोमनाथ आंबुरे ऊर्फ … Read more

मतदार यादीत दुरुस्तीची बतावणी करून ज्येष्ठाची १२ लाखांची फसवणूक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मतदार यादीत तुमच्या वडिलांचे नाव मिसमॅच होत आहे, त्याची दुरुस्ती करायची आहे, अशी बतावणी करून सायबर चोरट्यांनी कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची ११ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

वाहनाच्या धडकेत श्वानाचा मृत्यू

कात्रजमधील संतोषनगर येथील घटना : वाहनचालकावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वाहनाच्या धडकेत श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रजमधील संतोषनगर भागात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत शहबाज मेहमूद खान (वय ५२, रा. अशोका आगम बिल्डिंग, संतोषनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका चारचाकी वाहनचालकाविरुद्ध मोटार … Read more

मिशन क्रॅकडाऊन अंतर्गत वडगाव शेरी येथे बेकायदा दीड लाखांचा गुटखा पोलिसांनी केला जप्त

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मिशन क्रॅकडाऊन अंतर्गत विशेष पथकाने वडगाव शेरी येथे छापा टाकून दोघांवर गुन्हा दाखल करत १ लाख ५९ हजार ८८० रुपयांचा गुटखा, तंबाखूजन्य पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला आहे. यलप्पा तिरकप्पा शेट्टी (वय ३५, रा. टेम्पो चौक, सचिन नगर, वडगाव शेरी) आणि चंद्रकांत फुलचंद पटवा (रा. विद्यानगर, वडगाव शेरी) … Read more

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून जप्त केले २ पिस्टल

नांदेड सिटी पोलिसांची कामगिरी : कॅनॉल रोडवर सापळा रचून कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारू विक्रीचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून नांदेड सिटी पोलिसांनी ९० हजार रुपये किमतीचे दोन गावठी पिस्टल जप्त केले आहेत. मारुती ऊर्फ मारी बाळू चव्हाण (वय २६, रा. यशवंत विद्यालयाजवळ, लांडगे वस्ती, खडकवासला) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. नांदेड सिटी … Read more

डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून लुटणारे ६ दरोडेखोर जेरबंद

पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखेच्या युनिट ४ ची कामगिरी : सराईत गुन्हेगारांवर यापूर्वीही दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मोटारसायकलवरून जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयचे रिक्षातून आलेल्या दरोडेखोरांनी अपहरण करून त्यांना मामुर्डी येथे नेले. तेथे त्यांना मारहाण करून लुटणाऱ्या ६ दरोडेखोरांना पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने जेरबंद केले आहे. सुरज शंकर चलवादी … Read more

विमाननगरमधील हॉटेलमध्ये विनापरवाना संगीत पार्टी

बॅक बेंचर्स हॉटेल मालकासह ६ जणांवर गुन्हा दाखल : पहाटेपर्यंत सुरू होता डान्स महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हॉटेलला कोणताही परवाना नसताना तेथे संगीत पार्टी आयोजित करून पहाटे साडेचार वाजेपर्यंत कर्णकर्कश आवाजात स्पीकर्स लावून मद्याचा विनापरवाना पुरवठा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी ६ तरुणींसह ३० तरुण दारूच्या नशेत पहाटेपर्यंत नाचत होते. विमानतळ पोलिसांनी … Read more

पोलीस असल्याचे सांगून तरुणांना लुबाडले

सोलापूर रोडवरील पहाटेची घटना : मोबाईलवरून ट्रान्सफर करून घेतले पैसे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस असल्याचे सांगून पहाटेच्या सुमारास जाणाऱ्या तिघा तरुणांकडून मोबाईलवरील फोन पेवरून पैसे ट्रान्सफर करण्यास लावून जबरदस्तीने लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अक्षयकुमार काशीराम राव (वय २८, रा. सोलापूर रोड, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना … Read more

रेल्वेच्या बुकिंग क्लार्कला चाकूने जीवे मारण्याचा प्रयत्न करून जबरी चोरी करणाऱ्या तिघांना बंडगार्डन पोलिसांनी डोंबिवलीहून केले जेरबंद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवरील सिनिअर बुकिंग क्लार्कला मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत, त्याच्याकडील रोकड, मोबाईल आणि सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या तिघा चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी डोंबिवलीहून जेरबंद केले आहे. जितेंद्र मोतीराम राठोड (वय २४, रा. रोकडी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव, सध्या रा. मुंब्रादेवी चाळ, भोपरगाव कमानी, डोंबिवली), … Read more