आवृत्ती , पुणे

रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा

येरवड्यातील गाडीतळ चौकातील घटना : लक्ष्मीनगर पोलिसांची सात जणांविरुद्ध कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येरवड्यात रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला महागात पडले. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी माजी नगरसेवक तसेच त्यांच्या मुलासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी माजी नगरसेवक किशोर राजाराम विटकर (वय ५१), हर्षद किशोर विटकर (वय … Read more

भांडवलाकरिता पैसे घेऊन ३८ लाखांना घातला गंडा

पती-पत्नी झाले फरार : व्यावसायिकाला वडिलांकडून जीवे ठार मारण्याची धमकी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : व्यवसायाच्या भांडवलासाठी व्यावसायिकाकडून पैसे घेऊन काम केले. त्यानंतर भांडवल परत न करता पती-पत्नी फरार झाले. त्यांच्या वडिलांनी अगोदर शब्द दिला असतानाही आता शब्द फिरविला. परत पैसे मागायला आल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. एका व्यावसायिकाची ३८ … Read more

नीलेश घायवळ टोळीतील सराईत गुंड जेरबंद

३ मोक्का गुन्ह्यांत होता फरार : गुन्हे शाखेच्या युनिट ३ कडून अटक पुणे : गँगस्टर नीलेश घायवळ टोळीचा सदस्य असलेला आणि ३ मोक्का गुन्ह्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुंडाला पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाला यश आले आहे. अभिजित उत्तम गोरडे (वय ३३, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, आशिष गार्डनजवळ, कोथरुड) असे या … Read more

भातंबरे येथे प्रतिबंधित गुटखा साठा जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

अन्न सुरक्षा कायद्यान्वये वैराग पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर ( वैराग ) ; सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध साठा व विक्रीविरोधात वैराग पोलिसांनी धडक कारवाई करत गुटखा माफियांना मोठा दणका दिला. महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा व तत्सम पदार्थांचा साठा करून विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध वैराग … Read more

जावयाची सासू, सासरे, मेव्हण्यावर काळी जादू

कोंढव्यातील कौसरबागेतील कबरस्तानात मध्यरात्रीची घटना : नागरिकांच्या दक्षतेमुळे प्रकार आला उघडकीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आपली पत्नी पुन्हा आपल्यासोबत राहण्यासाठी तसेच सासरकडून पैसे मिळावेत, यासाठी जावई चक्क काळी जादू करत असल्याचा धक्कादायक प्रकार कोंढव्यातील कौसरबाग येथील कबरस्तानात उघडकीस आला आहे. नागरिकांच्या दक्षतेमुळे हा प्रकार समोर आला. याबाबत हसनेन रफिक जाफरानी (वय ४०, रा. फिरदोस … Read more

पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांची एटीएसला बदली

हिम्मत जाधव यांच्याकडे अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स : शिवाजी पवारांकडे महामार्ग सुरक्षा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राज्यातील पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गेल्या आठवड्यात बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, हिम्मत जाधव आणि डॉ. शिवाजी पवार यांना पुण्यातील विविध विभागांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. … Read more

बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजमध्ये गौरव

गुणवत्ता प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि मेरिट स्कॉलरशिप देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचालित सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या वतीने बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पदके तसेच मेरिट स्कॉलरशिप देऊन गौरविण्यात आले. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. … Read more

राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्काराने चार सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षक भवन, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात पुणे जिल्ह्यातील चार सामाजिक कार्यकर्त्यांना “राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सामाजिक, आरोग्य, रक्तदान आणि निराधारांसाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला. भिगवण येथील सचिन बोगावत यांना कोरोना काळात प्लाझ्मा, मास्क, सॅनिटायझर तसेच गरजूंना … Read more

सिद्धी फाउंडेशनचा १८ वा रक्तदान महायज्ञ

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ठरला विशेष आकर्षण : २०२६ रक्तदात्यांचा विक्रमी सहभाग महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : समाजसेवा आणि मानवतेचा संदेश देणारा सिद्धी फाउंडेशनचा १८ वा रक्तदान उपक्रम गुरुवार, २१ मे रोजी महावीर प्रतिष्ठान, डी जॅकपुणे येथे अत्यंत उत्साहात पार पडला. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या भव्य रक्तदान शिबिरात तब्बल … Read more