आवृत्ती पुणे

महारेराचा ट्विन स्टार इन्फ्रास्ट्रक्चर ला दणका

वास्तू इम्पीरियल विंग A मधील २९ गृहखरेदीदारांना दिलासा : व्याजासह परतावा देण्याचे आदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डिसेंबर २०२४ मध्ये बांधकाम पूर्ण करून ताबा देण्याचे आश्वासन दिले असतानाही वर्ष होत आले, तरी बांधकाम पूर्ण न करणाऱ्या ट्विन स्टार इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला महारेराने दणका दिला आहे. गृहखरेदीदारांना विलंब व्याजासह ताबा देण्याचे तसेच लागू असल्यास व्याजासह … Read more

अंमली पदार्थ तस्कराकडून ११ लाखांचे मॅफेड्रॉन जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाची वाघोलीमध्ये राजस्थानी गुन्हेगारावर कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थाचे व्यसन लागलेल्या एका राजस्थानी तस्कराला पकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्याकडून ११ लाख १० हजार रुपयांचे ५१ ग्रॅम ५० मिलिग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त केले आहे. लेखाराम धर्मराज चौधरी (वय २७, रा. केसनंद-वाघोली रोड, चिरायु हॉस्पिटलच्या इमारतीच्या मागे, वाघोली) असे या … Read more

बार्शी तालुका पोलीस ठाण्याकडून आगळगावमध्ये अमली पदार्थविरोधी जनजागृती

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीमेअंतर्गत बार्शी तालुका पोलीस ठाणे यांच्या वतीने मौजे आगळगाव येथील लोकसेवा उच्च माध्यमिक विद्यालयात आज जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास शालेय विद्यार्थी तसेच आगळगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता करण्यात आली असून तो 11.30 वाजता यशस्वीपणे संपन्न झाला. या वेळी … Read more

स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

नवी पेठेतील घरात गळफास घेऊन संपविले जीवन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले आहे. नवी पेठेतील घरामध्ये शुक्रवारी दुपारी हा प्रकार समोर आला. तरुणाने नैराश्यातून हे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सागर सुभाष पवार (वय २६, रा. मेहेकर, जि. बुलढाणा) असे या … Read more

खडकवासल्याचा “श्रावण बाळ” संदीप मतेंना साथ द्या : आमदार सचिन अहिर

उज्जैन यात्रेसाठी महिला भगिनींना ओळखपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित उज्जैन महाकाल यात्रेतील 3000 महिला भगिनींना ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम खडकवासला परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पुणे शहर संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी खडकवासल्याचा “श्रावण बाळ” म्हणून ओळखले जाणारे संदीप मते पाटील यांचे विशेष कौतुक … Read more

परिमंडळ ४ मधील २०९ हरवलेले मोबाईल परत

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : परिमंडळ ४ मधील हरविलेले/गहाळ झालेले २०९ मोबाईल अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या हस्ते मूळ मालकांना समारंभपूर्वक परत करण्यात आले. परिमंडळ ४ अंतर्गत चतु:श्रृंगी, बाणेर, खडकी, शिवाजीनगर, लोणीकंद, वाघोली, खराडी, येरवडा, विश्रांतवाडी, विमानतळ या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) या पोर्टलवरील तक्रारी तसेच पुणे शहर पोलीस दलाच्या … Read more

मध्य शहरातील हरवलेले १९३ मोबाईल मूळ मालकांना परत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : परिमंडळ १ कार्यक्षेत्रातील खडक, समर्थ, फरासखाना, विश्रामबाग, शिवाजीनगर, डेक्कन पोलीस ठाण्यांच्या परिसरात हरवलेले/गहाळ झालेले १९३ मोबाईल एका कार्यक्रमात पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले. खडक पोलीस ठाण्यातील ४० मोबाईल, समर्थ ५०, फरासखाना १९, डेक्कन ४०, शिवाजीनगर ३०, विश्रामबाग १४ असे एकूण १९३ मोबाईल हे सीईआर … Read more

बार्शी नगरपालिका निवडणूक २०२५ : शांततेसाठी पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

दारूबंदी, जुगारबंदी, गुन्हेगारांवर धडक कारवाई : ४ जणांना हद्दपार, ४७ जणांना तात्पुरता बंदोबस्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ शांततेत व सुरळीत पार पडावी, तसेच कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्याकडून विविध प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने बार्शी शहर पोलीस ठाण्याने महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियमांतर्गत … Read more

कुख्यात गुंड गजा मारणेला जामीन मंजूर

कोथरूडमधील आयटी अभियंता मारहाण प्रकरण : खुनाचा प्रयत्न व मोक्का अंतर्गत कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शिवजयंतीच्या दिवशी कोथरूड परिसरात वाहतूक कोंडीमधून उद्भवलेल्या वादातून आयटी अभियंत्याला मारहाण केल्या प्रकरणात कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला विशेष मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सिटी प्राइड थिएटरमध्ये चित्रपट पाहून गजा मारणे व त्याचे साथीदार हे … Read more

दहशत निर्माण करणारा फरार सराईत गुंड जेरबंद

येरवडा पोलिसांची कारवाई : कामराजनगर परिसरात पसरविली होती दहशत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एमपीडीए आणि मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराने आपल्या साथीदारांसह येरवड्यातील कामराजनगर येथे जुन्या वैमनस्यातून वाहनांची तोडफोड करून तरुणावर वार करत दहशत पसरवल्यानंतर जवळपास दोन महिने फरार असलेल्या गुन्हेगाराला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. समीर शब्बीर शेख (वय … Read more