आवृत्ती , पुणे

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटींची फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची १ कोटी ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ४५ वर्षीय नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वारजे माळवाडी भागातील एका सोसायटीत राहतात. सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात फिर्यादीशी संपर्क … Read more

सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन : पदभार स्वीकार

कुमार आशीर्वाद यांची नागपूरला बदली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे राज्य सरकारने गुरुवारी जबाबदारी सोपवली. त्यांनी शुक्रवारी दुपारी माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पदभार स्वीकारला. माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या काळात … Read more

२ कोटींची फसवणूक केलेल्यांपैकी तिघांना अटक

बँकॉक, म्यानमारप्रमाणे सायबर फसवणुकीचे कॉल सेंटर काढणार होते नवी मुंबईत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पिंपरी-चिंचवडच्या सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. बँकॉक व म्यानमार येथे सायबर फसवणुकीच्या कॉल सेंटरमध्ये काम केलेले पश्चिम बंगाल व पंजाब येथील दोघे जण … Read more

सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल, काडतूस जप्त

नर्‍हे पोलिसांची कामगिरी : बीडमधील वादातून सुरक्षेसाठी बाळगले होते महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीवरून नर्‍हे पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून एक पिस्टल व एक काडतूस जप्त केले आहे. अमोल पद्माकर सोळुंके (वय २४, रा. आरोही सोसायटी, रायकर मळा, धायरी; सध्या रा. पार्वती हाइट्स, नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या मागे) असे अटक … Read more

पुण्यात एप्रिल महिन्यातील १३० वर्षांनंतर विक्रमी पाऊस

४ एप्रिल १८९६ रोजी झाला होता ५१ मिमी पाऊस : गुरुवारी शिवाजीनगर ६५, खडकवासला १०७ मिमी पावसाची नोंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरात गुरुवारी दुपारी झालेला तुफानी अवकाळी पाऊस ऐतिहासिक ठरला आहे. पुणे हवामान विभागाच्या गेल्या १५० वर्षांच्या नोंदीनुसार गुरुवारी झालेला पाऊस हा एप्रिल महिन्यातील विक्रमी पाऊस ठरला आहे. या विक्रमी पावसामुळे संपूर्ण … Read more

सिंहगड रोडवर झाड कोसळून महिलेचा मृत्यू

झाडपडीच्या ८२ घटना : पाणी साचल्याच्या ६ तर भिंत पडल्याची १ घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहराला आज पावसाने अभूतपूर्व तडाखा दिला. या पावसाच्या तडाख्याने पुणेकरांची दाणादाण उडाली. सिंहगड रोडवर एक मोठे झाड कोसळल्याने त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. झाड व भिंत पडून काही ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. सिंहगड रोड, … Read more

उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयात ओएसडी असल्याचा बनाव

पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी भोंदूची तोतयागिरी उघडकीस आणली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : समर्थ पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात व्यवस्थित तपास केला नसल्याचे सांगून, आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात ओएसडी असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तीची तोतयागिरी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी उघडकीस आणली. या तोतयाविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रद्युम्न श्रीहरी पाटील (वय ४७, रा. … Read more

अपहरणाच्या गुन्ह्यातील आरोपीकडून ड्रग्ज रॅकेटचा उलगडा

३०० जणांना ड्रग्ज विकल्याचे निष्पन्न : उत्तमनगर पोलिसांनी चौघांना केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतर गेले ८ महिने फरार असलेल्या गुन्हेगाराला उत्तमनगर पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ३ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) व दोन मोबाईल जप्त करण्यात आले. मोबाईलमधील व्यवहारांवरून या गुन्हेगाराने तब्बल २५० ते ३०० जणांना अंमली पदार्थ विकले असून, त्यातून त्याच्याकडे … Read more

दोघा ज्येष्ठ नागरिकांची ३ कोटींची फसवणूक

शेअर ट्रेडिंगमध्ये जादा परताव्याचे आमिष : डिजिटल अरेस्टची दाखविली होती भीती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांची ३ कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्याच्या बतावणीने सहकारनगर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी १ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक केली. दुसऱ्या … Read more