आवृत्ती , पुणे

भरधाव कार खाली चिरडून युवकाचा मृत्यू

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येरवडा गोल्फ क्लब समोर भरधाव कार खाली चिरडून युवकाचा मृत्यू झाला. काल दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. पहिल्या कारच्या धक्याने त्याची दुचाकी रस्त्यावर पडली. त्याचवेळी मागून आलेल्या कार खाली तो आला. कारचालक अपघाताची खबर न देता पळून गेला. अपघातात केदार मोहनराव चव्हाण (वय ४१, रा. मोहन नगर, धनकवडी पुणे) … Read more

सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नरेंद्र गंभिरे

उपाध्यक्षपदी सुचेता थोबडे यांची निवड महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : येथील सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नरेंद्र महादेव गंभिरे व उपाध्यक्षपदी सुचेता मिलिंद थोवडे यांची एकमताने निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यु. यु. पवार यांनी जाहीर केले. सिध्देश्वर बँकेच्या अध्यक्षपदासाठी नरेंद्र महादेव गंभिरे यांचे नांव प्रकाश वाले यांनी सुचविले तर पशुपतीनाथ माशाळ यांनी अनुमोदन दिले. … Read more

चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या आरोपीस केले जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बसची वाट पाहत थांबले असताना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना भारती विद्यापीठ ठाण्याच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.११ जुन रोजी कात्रज चौक येथुन सोलापुर येथे जाण्या करीता फिर्यादी (रा. कात्रज, पुणे) हे बसची वाट पाहत थांबले असताना दोन अनोळखी इसम फिर्यादी … Read more

निबंध स्पर्धेत सुमतीलाल भंडारी यांना प्रथम पारितोषिक

अरिहंत जागृती मंचच्या वतीने आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अरिहंत जागृती मंच, पुणे तर्फे “आधुनिक युगात जैन श्रावकाचार” या विषयावरील निबंध स्पर्धेचा पारितोषिक प्रदान समारंभ उत्साहात पार पडला. जैन धर्माचे अभ्यासक सुमतीलाल भंडारी यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. डॉ. प्रवीण पगारिया व शोभा कांकरिया यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले. अरिहंत जागृती मंच, … Read more

‘मकून्स’ च्या पहिल्याच प्रि- स्कूलचा दिलीप सोपल यांच्या हस्ते शुभारंभ

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : वाजवी शालेय फी मध्ये बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक अद्ययावत सुविधांसह सुसज्ज ‘मकून्स’ या प्रि स्कूल चा शुभारंभ माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते परांडा रोड, गांधी चौक येथे १५ जून रोजी करण्यात आला. बालकांचा सर्वांगीण विकास करणारी उच्च बाल मनोवैज्ञानिक बाबींनी परिपूर्ण नाविन्यपूर्ण जगविख्यात प्रि स्कूल मकून्स बार्शीकरांच्या सेवेत सुरूझाली … Read more

शेअर मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १३ लाखाची फसवणूक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहण्याने महीलेची १३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना कर्वेनगर येथे घडली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या बाबत एका ५८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर २३ ते जानेवारी २४ या दरम्यान घडला. फिर्यादी महिलेस मोबाईल वर व्हॉटसअप ग्रुप मध्ये घेऊन तरुणाने गुंतवणूक केल्यास मोठी … Read more

नऱ्हे आंबेगाव मध्ये गुटखा गोदामावर छापा

दिड कोटीचा अवैध गुटखा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुन्हे शाखा युनिट २ व गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे शहरातील नऱ्हे आंबेगाव येथील भेसळयुक्त गुटखा तयार करणाऱ्या फँक्टरी व गोदामावर छापा टाकला. यावेळी पोलीसांना १,६३,२४,३००/-रु. गुटखा, व डुप्लीकेट गुटखा जप्त करण्यात यश आले आहे. पुणे शहरामध्ये बेकायदेशिर अवैध धंदयावर गुन्हे शाखेमार्फत कारवाई … Read more

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ८ गुन्हेगार केले तडीपार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ८ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा (हद्यपार) क. ५५ प्रमाणे पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून त्यांना हद्यपार करण्यात आलेले आहे. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारांवर परिणामकारक व ठोस अशी कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते. … Read more

पोलीस शिपाई चालक संवर्गातील भरती सुरु

१९ जुन : पोलीस मुख्यालय येथे वेळेत उपस्थित रहा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक संवर्गातील एकूण २०२ रिक्त पदे भरण्याकरिता १९ जूनपासून पासून पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे भरती प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. भरतीसाठी पात्र सर्व उमेदवार यांनी ऑनलाईन आलेल्या प्रवेशपत्रावर दिलेल्या तारखेस भरती प्रक्रियेसाठी उपस्थित … Read more

४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पूना हॉस्पिटलच्या वतीने भविष्यवेधी योजना जाहीर

४० व्या वर्षानिमित्ताने रुग्णालयाच्या नव्या बोधचिन्हाचे अनावरण महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गेली ४० वर्षे अव्याहतपणे रुग्णसेवेचा व लोकसेवेचा वसा समर्थपणे पेलणाऱ्या पूना हॉस्पिटलने ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने अनेक भविष्यवेधी योजना जाहीर केल्या असून यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांसाठी हेल्थ कार्ड्स, हेल्थ पॅकेजेस आणि शहरातील इतर वैद्यकीय संस्थांसोबत संलग्नपणे रूग्णापर्यंत पोहोचण्यासाठी शहरातील विविध भागांत आरोग्य शिबिरे … Read more