महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : वाजवी शालेय फी मध्ये बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक अद्ययावत सुविधांसह सुसज्ज ‘मकून्स’ या प्रि स्कूल चा शुभारंभ माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते परांडा रोड, गांधी चौक येथे १५ जून रोजी करण्यात आला.
बालकांचा सर्वांगीण विकास करणारी उच्च बाल मनोवैज्ञानिक बाबींनी परिपूर्ण नाविन्यपूर्ण जगविख्यात प्रि स्कूल मकून्स बार्शीकरांच्या सेवेत सुरूझाली आहे. ‘मकून्स प्री-स्कूल’ चा अभ्यासक्रम हा प्रत्येक मूल एक ‘अद्वितीय व्यक्ती’ आहे या कल्पनेवर आधारित आहे.
३० पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त, देशातील सोळा राज्यात, जगातील चार देशात, २०० पेक्षा जास्त युनिट असलेली प्रि-स्कूल आता बार्शीत आली आहे. शुभारंभ प्रसंगी बार्शी नगरपरिषद शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे बार्शी सेक्रेटरी मोइझभाई काझी, दंतरोगतज्ञ.वर्षा शेळके, वैचारिक चळवळीचे लेखक, स्मार्ट अकादमी या वक्तृत्व प्रशिक्षण चळवळीचे संचालक सचिन वायकुळे, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक मुळीक, बार्शी दिवाणी फौजदारी न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ एम. पी. धस, बार्शी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक. शंकरराव देवकर, प्रख्यात व्यवसायिक दत्तात्रय बाबर. अध्यापक विद्यालयाचेमाजी प्राचार्य नंदकुमार काशीद, पंचायत समिती बार्शी कृषी अधिकारी किशोर अंधारे, पुरोगामी चळवळीचे वक्ते किशोर मांजरे, मुंबई पोलीस दलातील पोलीस उपनिरिक्षक प्रितम बरबडे, वारकरी सांप्रदायिक संस्थेचे ह.भ.प श्री. भास्कर मांजरे महाराज यांसह बालक पालक उपस्थित होते.
यावेळी शाळेचे स्थानिक विश्वस्थ. निलेश मांजरे पाटील, समीना चिस्ती, अफरोज पठाण यांनी उपस्थितांना शाळेच्या नावीन्य पूर्ण अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली. शुभारंभाचे प्रमुख पाहुणे माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते शाळेचा शुभारंभ करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. शाळेचे स्थानिक विश्वस्थ निलेश मांजरे पाटील, समीना चिस्ती, अफरोज पठाण यांनी मकून्स शाळेच्या शैक्षणिक उत्कृष्टता, नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम, हे प्रत्येक मुलाच्या वैयक्तिक गरजा, प्रतिभा, क्षमता आणि आवडीनुसार कसे तयार करण्यात आलेले आहेत याबाबत माहिती दिली.
बाल-केंद्रित क्रियाकलापांच्या श्रेणीसह आणि सुरक्षित आणि पालनपोषण करणारे वातावरण, मुलांना शिकत असताना मौज सुद्धा मिळते. मुले झटपट शिकणारी असतात. जितक्या लवकर ते नवीन गोष्टी शिकण्यास सुरवात करतात तितक्या लवकर ते जुळवून घेतात.
या कार्यक्रमात मुलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते, ज्याचा उद्देश त्यांना बालपणीच्या शिक्षण पद्धतीची ओळख करून देणे आणि त्यांच्या वयातील काही नवीन मित्रांशी संवाद साधणे हा आहे. बार्शीतील बालकांना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक अभ्यासक्रमाचे अनौपचारिक आणि औपचारिक शिक्षण बालपणापासून आवड निर्माण करून गोडी लावण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमास उपस्थितांनी शुभेछा दिल्या.
संगीत, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, संख्याशास्त्र, भौतिक संशोधन यांचा समावेश असलेल्या आगळ्या वेगळ्या अभ्यासक्रमाद्वारे बालकाच्या बुद्धिमत्तेच्या विकासासाठी बालमनोवैज्ञानिक पैलूचा विचार करून उपक्रम आखलेले आहेत. मकून्सचा अभ्यासक्रम वाचन, लेखन, भाषा, गणित, विज्ञान, कला, संगीत आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या क्रियाकलापांवर केंद्रित आहे. शिक्षक आणि प्रशासक मुलांचे ऐकण्यात आणि त्यांच्याशी बोलण्यात वेळ घालवतात, मुलांना त्यांच्या दैनंदिन शिक्षणावर विचार करण्यास मदत करतात. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सकारात्मक संवाद भावनिक, भाषिक आणि सामाजिक कौशल्यांच्या विकासास प्रोत्साहन देतात, ज्यामुळे आत्मसन्मानाची तीव्र भावना निर्माण होते.
