महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहण्याने महीलेची १३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना कर्वेनगर येथे घडली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या बाबत एका ५८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर २३ ते जानेवारी २४ या दरम्यान घडला.
फिर्यादी महिलेस मोबाईल वर व्हॉटसअप ग्रुप मध्ये घेऊन तरुणाने गुंतवणूक केल्यास मोठी रक्कम मिळेल असे आमिष दाखविले.
त्यामुळे त्यांनी बँक खात्यात १३,१४७५८ रुपये भरले. गुंतवणूक केली. मात्र परत पैसे मिळाले नाहीत. अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
