आवृत्ती पुणे

मोठ्या अंमली पदार्थाच्या साठ्यासह दाम्पत्य ताब्यात

कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल : संशयावरून पोलिसांनी केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक एकने पती-पत्नीला ताब्यात घेऊन १३ लाख ४० हजारांचे चरस व एम.डी. हे अंमली पदार्थ हस्तगत केले. त्यांच्याकडून कार व ईतर ऐवजासह एकूण १९ लाख ५ हजार ४२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. मोहम्मद अफजल अब्दुलसत्तार नागोरी … Read more

रिक्षाचालकाला मारहाण करणारे चौघे जेरबंद

दत्तवाडी पोलिसांची कामगिरी : जनता वसाहतीमधील शंकर मंदिराजवळ घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षाचालकाला शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या चौघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केले. पर्वती-जनता वसाहतीमधील शंकर मंदिराजवळ ही घटना २६ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली. वसीम शब्बीर शेख (वय १९), असिम शब्बीर शेख (वय १९), मौसिन शब्बीर शेख, वय २१), रहिम … Read more

व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचा सपासप वार करुन खून

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : आंबेगाव बुद्रुकमधील नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडवर घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कर्जाऊ दिलेल्या पैशाचे व्याज न दिल्याने झालेल्या वादातून दोघांनी एका तरुणावर सपासप वार करुन त्याचा खून केला. हा प्रकार कात्रज-सिंहगडरोड दरम्यानच्या नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडवर रात्री साडेअकरा वाजता घडला. शरद शिवाजी आवारे (वय ४३, रा. संभाजीनगर, … Read more

वाहन चोरट्याकडून दोन गाड्या हस्तगत

दोन गुन्हे उघड : डेक्कन पोलिसांची दमदार कामगिरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एस. एम. जोशी पुलाखाली संशयास्पदरित्या थांबलेल्या चोरट्याला पकडून डेक्कन पोलिसांनी वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. विनायक किरण पाटोळे (वय १९, रा. जनवाडी) असे या चोरट्याचे नाव आहे. डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले की, तपास पथकातील … Read more

अल्पवयीन लैलावर बलात्कार करणारा मजनू जेरबंद

वडगावशेरीतील घटना : मोबाईलवर व्हीडिओ शूट करत धमकी देत केला बलात्कार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाण्यात आणि बीडमध्ये अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. आता पुण्यातील वडगाव शेरी येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. … Read more

२६-११च्या हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली

सारसबाग येथे कार्यक्रमाचे आयोजन : चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्राचे वितरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : २६-११ च्या हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांना सारसबाग येथे अभिवादन करण्यात आले. पुणे शहर पोलीस दल व सेवा मित्रमंडळ ट्रस्टच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी ८.३० ते ८.४० शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शहिदांच्या स्मरणार्थ चित्रकला … Read more

मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली

पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे : येरवडा येथील वाहतूक कार्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरामध्ये कोरोना महामारीमध्ये रक्ताचा तुटवडा भासल्याने रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणी आल्या. त्यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी येरवडा येथील वाहतूक … Read more

कारवाईला विरोध करुन पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न

दोघांना केली अटक : पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन परिसरातील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी आलेल्या शिवीगाळ करुन धमकावून कारवाईला विरोध करताना स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून काडेपेटीने पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना आंबेगाव खुर्द येथे घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कुणाल आनंद साळुंके … Read more

स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली 84 लाखांना गंडा

पुण्यातील शिवाजीनगर गावठाणातील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कस्टम अधिकारी असल्याचे सांगून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून ८४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शिवाजीनगर गावठाण येथे फिर्यादीच्या घरी १३ सप्टेबर २०२० ते १६ जानेवारी २०२१ दरम्यान घडला. विशाल दीपक गायकवाड (वय ३३, रा. पिंपळे गुरव) आणि माधवी किशोर … Read more

सोशल मिडियावर गाद्या विकणे आले अंगाशी!

सायबर पोलिसांत फिर्याद : महिलेला सायबर चोरट्यांनी घातला साडेपाच लाखांना गंडा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : टीव्हीवरील जाहिराती पाहून फेसबुकवर गाद्या विक्री करण्याचा एका महिलेचा प्रयत्न चांगलाच अंगाशी आला आहे. सायबर चोरट्यांनी या गाद्या खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करुन त्यांची ५ लाख ४३ हजार ६१ रुपयांची फसवणूक केली. २२ ते २७ डिसेंबर २०२० दरम्यान … Read more