चतुश्रुंगी पोलिसांची कामगिरी : पाच लाख १० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क
पुणे : शहर व जिल्ह्यामध्ये चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा चतुश्रुंगी पोलिसांनी पर्दापाश करीत चौघांना अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख १० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
देवाराम अंकुश चव्हाण (वय ३३), निखील प्रवीण भोसले (वय २१), करण शरन्या भोसले (वय २१, तिघे रा. माळेगाव बु, ता. बारामती, जि. पुणे), नसरुद्दीन हिरामण भोसले (वय २०, रा. कोऱ्हाळे, पानगेवस्ती, ता. बारामती, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, चंदनचोरी करणाऱ्यांची चतुश्रुंगी पोलिसांना सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कोऱ्हाळे, पानगेवस्ती, ता. बारामती, जि. पुणे येथे धाव घेत सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून शेवरेलेट वाहन क्र.एमएच-१४-बीसी-९१६२, लोखंडी करवत, कटावणी, कुऱ्हाड, गिलवर, दोरी असा एकूण तीन लाख ५७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर चतुश्रुंगी, बंडगार्डन, वानवडी, कोंढवा, भारती विद्यापीठ, विमानतळ, सासवड, उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये १६ गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रमेश शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त रोहितदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश गलांडे, चतुश्रुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक विजयकुमार लांबतुरे, पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार सुधीर माने, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, मुकुंद तारू, बाबा दांगडे, आशिष निमसे, दिनेश गडाकुंश, प्रकाश आव्हाड, बाबुलाल तांदळे, तेजस चोपडे, अजय शिर्के यांच्या पथकाने ही कामगिरी केली.















