आवृत्ती पुणे

बनावट कागदपत्राद्वारे जामीन मिळवून देणार्‍या रॅकेटवर ‘धाड’

युनिट-१ व ५ ची धडाकेबाज कारवाई : शिवाजीनगर न्यायालयाबाहेरच सात जणांना बेड्या ठोकल्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे :गुन्हे शाखेने गेल्या वर्षी गुन्हेगारांना जामीन मिळवून देणार्‍या रॅकेटचा भांडाफोड केला होता. आता पुन्हा एकदा शिवाजीनगर न्यायालयाबाहेर कारवाई करुन गुन्हेगारांना बनावट कागदपत्राद्वारे जामीन मिळवून देणार्‍या ७ जणांना बेड्या ठोकल्या. गोपाळ पुंडलिक कांगणे (वय ३३, रा. मोरवाडी, पिंपरी), … Read more

दुकानातून रोकड चोरणाऱ्या सराईताच्या मुसक्या आवळल्या

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : ५० हजार रुपयांचा ऐवज केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणी काळभोरमधील दुकानातून रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. लोणी काळभोर पोलीसांनी ही कामगिरी केली. निलेश मिठू कदम (रा. नायगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी … Read more

तरुणीने अंधाशी लग्न करून लाखोंचा ऐवज केला लंपास

विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : तरुणीसह पाच सापडले अडचणीत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या तरुणाबरोबर लग्न केले. तरुणाच्या वडिलांकडून वेळोवेळी लाखो रुपये घेतले अन् एके दिवशी घरातील दागिने घेऊन तिने पोबारा केला. या प्रकारामुळे पाचजण चांगलेच अडचणीत सापडले आहेत. हा प्रकार ३१ जानेवारी ते २१ जुलै दरम्यान घडला. याप्रकरणी विमानतळ … Read more

पालिकेचा आरोग्य निरीक्षक लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ड्युटी ठराविक ठिकाणी देण्यासाठी मागितली होती लाच : कचरा गोळा करणाऱ्याने केली होती तक्रार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकास लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (दि. ११) दुपारी रंगेहाथ पकडले आहे. कचरा गोळा करणार्‍या एकाने तक्रार दिल्यानंतर अ‍ॅन्टी करप्शन विभागाने ही कारवाई केली आहे. मनपाच्या आरोग्य निरीक्षकाने डयुटी ठराविक … Read more

आक्रम शेख टोळीविरुद्ध “मोक्का कायद्यांतर्गत कारवाई “

पोलीस आयुक्त यांची मोक्का अंतर्गत ५८ वी कारवाई : गुलटेकडी परिसरात दहशत निर्माण करीत होता महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीमधील डायस प्लॉट, गुलटेकडी येथे स्वतःला भाई, दादा समजून समाजामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगार अजिज शेख टोळीविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहराचा कारभार घेतल्यानंतर … Read more

एम. जी. एन्टप्रायजेसच्या अलनेश सोमजीच्या पोलीस कोठडीत वाढ

कोट्यवधी रुपयांचे फसवणूक प्रकरण : पत्नी डिंपल सोमजीचा जामीनासाठी अर्ज महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर वार्षिक 24 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील अनेक नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एम.जी. एन्टप्रायजेसच्या अलनेश अकील सोमजी, डिंपल अलनेश सोमजी (दोघे रा. अमर वेस्टव्हिड, लेन नं. 5, कोरेगाव पार्क, पुणे) यांना पुणे गुन्हे शाखेच्या … Read more

जबरी चोरी करणारी टोळी पंढरपूर पोलिसांच्या ताब्यात

पंढरपूर-सोलापूर मार्गावरील घटना : एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जबरीचोरी करून लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला पंढरपूर स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. आरोपींकडून एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पंढरपूर-सोलापूर तिऱ्हे मार्गावर अंकोली (ता. मोहोळ) येथे ५ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास पती-पत्नीला लुटले होते. विजय उर्फ … Read more

पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह १०० जणांनी केले रक्तदान

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रक्तदात्यांचे गुलाबपुष्प देऊन केले स्वागत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रक्तदान शिबिरामध्ये पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह १०० पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणत्र देण्यात आले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रक्तदात्यांचे स्वागत करून गुलाबपुष्प देऊन आभार मानले. डिफरन्स स्ट्रोक्स ही संस्था डिफेन्सकरिता रक्तदान शिबिराचे … Read more

अपहरणाचा बनाव करणाऱ्या मुलीचा सहा तासांत घेतला शोध

शिक्रापूर पोलिसांची कामगिरी : स्वत:च बनाव करून मागितली 5 लाखांची खंडणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचून घरच्यांकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार शिक्रापूर (जि. पुणे) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अल्पवयीन मुलीचा अवघ्या सहा तासात शोध घेऊन तिला तिच्या पालकांच्या ताब्यात … Read more

ज्येष्ठ नागरिकास सव्वा कोटी रुपयांचा गंडा घालणारा अटकेत

दत्तवाडी पोलिसांची कामगिरी : २८ एप्रिल २०१५ ते २२ मार्च २०१६ दरम्यान घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोकणात जागा विकसित करुन देतो, असे सांगून ज्येष्ठ नागरिकास तब्बल १ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या बांधकाम व्यावसायिकास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार पर्वतीतील भूमी सोसायटी, सदाशिव पेठेतील श्रीनिवास कन्स्ट्रक्शनचे … Read more