पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रक्तदात्यांचे गुलाबपुष्प देऊन केले स्वागत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : रक्तदान शिबिरामध्ये पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह १०० पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणत्र देण्यात आले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रक्तदात्यांचे स्वागत करून गुलाबपुष्प देऊन आभार मानले.
डिफरन्स स्ट्रोक्स ही संस्था डिफेन्सकरिता रक्तदान शिबिराचे आयोजन करून तो रक्तसाठा आर्म फोर्स मेडिकल कॉलेज यांना पुरविण्याचे काम करते. आतापर्यंत जमा केलेला रक्तसाठा आर्म फोर्स मेडिकल कॉलेज यांच्याद्वारे आर्मीच्या जवानांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. अक्षय ब्लड सेंटर संस्थेच्या वतीने थॅलॅसिमिया, ॲनेमिया आणि समाजातील दुर्बल घटकांना मोफत रक्ताचा पुरवठा करते. अक्षय ब्लड बँक सेंटरच्या वतीने रक्तदात्यांना प्रमाणित प्रमाणपत्र प्रदान करते. या प्रमाणपत्राआधारे लाईफ टाईम मोफत रक्तपुरवठा केला जातो.
शिवाजीनगर येथील पोलीस हॉस्पिटलमध्ये डिफरन्ट स्ट्रोक्स संस्था व अक्षय ब्लड सेंटर आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, डॉ. राऊत, डॉ. देशपांडे, वैद्यकीय अधिकारी पोलीस हॉस्पिटलचे डॉ. वडगाये, डॉ. कर्नलसुजय भौमिक, डिफरन्ट स्ट्रोक्स संस्थेचे पर्नल देखणे, मनिषा धारणे, अक्षय ब्लड बँकेचे महेश रणदिवे आदी मान्यवर उपसथित होते.
