आवृत्ती पुणे

पालिकेच्या कचरा गाडीला धडकल्याने स्विफ्ट कारचा अपघात

कारचालकाचा मृत्यू : मुंढवा-घोरपडी रस्त्यावर शुक्रवारी पहाटे घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महानगरपालिकेचा कचरा सफाई करणारा ट्रक रस्त्याच्या कडेची सफाई करत असताना भरधाव वेगातील स्विफ्ट कार पाठीमागून धडकून अपघात झाला. या अपघातामध्ये कारचालकाचा मृत्यू झाला. मुंढवा-घोरपडी रस्त्यावरील कचरे वस्ती सुभाष घई बंगल्याजवळ शुक्रवारी (दि.8) पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. प्रशांत जगन्नाथ … Read more

सात वर्षांपासून फरारी गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

युनिट-१ची कारवाई : तीन गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मारामारीच्या गुन्ह्यातील ७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीच्या गुन्हे शाखा युनिट-१ने मुसक्या आवळल्या. आरोपीवर खुनाचा प्रयत्न, मारामारी, दरोड्याची तयारी असे तीन गुन्हे भारती विद्यापीठ, बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. राहुल संजय क्षीरसागर (वय २३, रा. जुनी पाण्याची टाकीजवळ, मांगडेवाडी, कात्रज, पुणे) … Read more

‘बॉम्ब’ ठेवल्याची अफवा पसरविणारा संगणक अभियंता ‘अटक’

लोहगाव विमानतळावर उडाली होती खळबळ : पत्नीला रांचीहून परत येण्याचे विमान तिकीट न दिल्यामुळे प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरविणाऱ्या एका संगणक अभियंत्याला विमानतळ पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. अफवेमुळे विमानतळावर खळबळ उडाली. रांचीला निघालेल्या विमान उड्डाणास तीन तास उशीर झाला. ॠषीकेश सावंत (वय २८, रा. बाणेर) असे अटक केलेल्याचे … Read more

विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये १५ बड्या धेंडांवर गुन्हा

हवेली सबरजिस्ट्रारची फिर्याद : ‘बिल्डर’ अविनाश भोसले, विनोद गोयंका आणि विकास ओबेराय यांचा समावेश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील ‘बिल्डर’ अविनाश भोसले यांच्यासह विनोद गोयंका, विकास ओबेराय यांच्यासह संगमसिटी टाऊनशीप प्रायव्हेट लिमिटेड तर्फे सिद्धार्थ, राजेंद्र, मयूर यांच्यावर जमिनीच्या खरेदीखतामध्ये खोट्या नोंदी करून तसेच खोट्या चतु:सीमा नमूद करून दिशाभूल करून खरेदीखताची नोंदणी केल्याप्रकरणी विश्रांतवाडी … Read more

व्यावसायिकाची ९७ लाख रुपयांची बॅग पळविणाऱ्यास ठोकल्या बेड्या

कर्जत व येरवडा पोलिसांची कामगिरी : ८० लाख रुपये हस्तगत, १७ लाख रुपयांचा तपास सुरू महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : व्यावसायिकाची ९७ लाख रुपयांची बॅग पळविणाऱ्या ड्रायव्हरला कर्जत व येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून ८० लाखरुपये हस्तगत केले असून, उर्वरित १७ लाख रुपयांचा तपास सुरू आहे. एनआयबीएम ते कल्याणीनगर दरम्यान ४ ऑक्टोबर २०२१ रोजी … Read more

50 लाखाची खंडणी मागणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

युनिट-१ची कारवाई : पुण्यातील व्यावसायिकाला ईडीच्या चौकशीचे धमकी प्रकरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या उद्योगसमूहाच्या एका कंपनीने घेतलेल्या कर्जामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा बनाव रचून आयकर विभागाची चौकशीची धमकी दिल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. एवढेच नाही तर आरोपींनी संनमत करुन हे प्रकरण मिटवण्यसाठी 50 लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार … Read more

महमंदवाडीमध्ये भरदिवसा झाडे उखडून टाकणाऱ्यावर गुन्हा

समाजकंटकावर कारवाई करा : सोसायटीतील नागरिकांनी झाडे तोडणाराचे काढले फोटो महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महंमदवाडी येथील मिथुन सोसायटीच्या बाहेरील बाजूला सार्वजनिक भुखंडावर वृक्षारोपण करण्यात आले होते. वृक्षारोपण करण्यात आलेली ही झाडे भरदिवसा उखडून टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समजताच मिथुन सोसायटीतील रहिवासी शुक्रवारी सकाळी रस्त्यावर आले. त्यांनी ही झाडे तोडतांना नागरिकांनी … Read more

सॅकमध्ये चरस लपविणारा नेपाळी पोलिसांच्या जाळ्यात

राजगड पोलिसांची कारवाई : खेड-शिवापूर टोल नाक्याजवळील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुंबई-बंगळूर महामार्गावर शुक्रवारी (दि. 8) पहाटेच्या सुमारास राजगड पोलिसांनी तब्बल 6 किलो चरस जप्त केले. आरोपीने सॅकमध्ये चरस लपवून ठेवले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या चरसची किंमत 32 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी एका नेपाळी तरुणाला अटक करण्यात आली आहे. … Read more

सलग दोन दिवस दोन चंदनाच्या झाडांची चोरी

उत्तमनगर पोलिसांत गुन्हा : सायंकाळी ६ ते रात्री १०च्या दरम्यान घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरामधील गांधी फार्म हाऊस आणि बोके फार्म हाऊस, मांडवी खुर्द येथील सुमारे बारा हजार रुपये किंमतीची दोन चंदनाची झाडे कटरने कापून चोरट्यांनी चोरून नेली. किसन शेंडे (वय ५५, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली … Read more

महिलेला बोलण्यात गुंतवून लुटले ३६ हजारांचे दागिने

समर्थ पोलिसांत गुन्हा : केईएम हॉस्पिटलशेजारील एस.व्ही. युनियन शाळेजवळील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अज्ञात चोरट्यांनी महिलेला बोलण्यात गुंतवून ३६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना के.ई.एम. हॉस्पिटलशेजारील एस. व्ही. युनियन शाळेजवळ घडली. समर्थ पोलीस स्टेशनमध्ये ८४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून, त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. … Read more