आवृत्ती , पुणे

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

क्लिनिकमध्ये तोडफोड केल्याने काच लागून रुग्ण जखमी : थेऊर येथील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मद्यपीच्या डोक्याला लागलेल्या जखमेवर डॉक्टरांनी मलमपट्टी केली. पैशांवरून वाद घालून मद्यपीने डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच क्लिनिकमध्ये तोडफोड केली. यावेळी काच लागून क्लिनिकमधील रुग्ण जखमी झाला. लोणी काळभोर पोलिसांनी या मद्यपीवर गुन्हा दाखल केला आहे. संतोष रमेश गुंजाळ … Read more

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

कार भाड्याने पुरविणार्‍या ऑटोरायडर कंपनीच्या कर्मचार्‍याने केली ९४० बनावट बिले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीला भाड्याने गाड्या पुरविणार्‍या ऑटोरायडर इंटरनॅशनल या कंपनीतील कर्मचार्‍याने कंपनीच्या ऑपरेशनल व बिलिंग प्रणालीमध्ये जाणीव पूर्वक खोटे व बनावट माहितीच्या आधारे इन्फोसिस या नामावंत कंपनीच्या नावाने ९४० खोटी बिले तयार करुन कंपनीला ४२ लाख ५० हजार ९४४ रुपयांना … Read more

एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

ज्येष्ठ नागरिकासह तरुणाची फसवणूक : नऱ्हे, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकासह दोघांची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिंहगड रोड परिसरातील एका तरुणाच्या मोबाईलवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी ७ लाख ६६ … Read more

चोर समजून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

कुत्री भुंकल्याने आला चोरांचा संशय : हडपसर येथील वैदुवाडीमधील पहाटेची घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पहाटेच्या सुमारास पुणे-सोलापूर रोडवरील वैदुवाडी येथे काही मुले दुचाकीवर थांबलेली आढळली. त्यांना पाहून कुत्री भुंकू लागली. कुत्री का भुंकत आहेत हे पाहण्यासाठी काही जण उठले. तेव्हा मुले थांबलेली दिसली. लोक आपल्याकडे येत असल्याचे पाहून ही मुले पळून जाऊ लागली. … Read more

खून करण्यासाठी येणाऱ्या चौघांना पोलिसांनी पकडले

मारहाणीचा बदला घेण्यासाठी येत होते : गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने घेतले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ कारणावरून डोक्यात दगड मारून जखमी केल्याच्या घटनेचा बदला घेण्यासाठी मांढरदेवी यात्रेतून कोयते खरेदी करून कट रचून खून करण्यासाठी येणाऱ्या चार अल्पवयीन मुलांना गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने पकडले. त्यामुळे संभाव्य खुनाची घटना … Read more

अंमली पदार्थ मिश्रित पावडर बनविणाऱ्या कारखान्यावर छापा

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई : जांभे गावातून दाम्पत्याला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पान टपरीवर मिळणाऱ्या नशा आणणाऱ्या पानातील अंमली पदार्थ मिश्रित पावडर बनविणाऱ्या हिंजवडीतील कारखान्यावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. अंमली पदार्थ विरोधी पथकाने येथून एका दाम्पत्याला अटक केली आहे. या कारखान्यातून ६ लाख ६३ हजार रुपयांची अंमली पदार्थ मिश्रित पावडर, … Read more

पूर्ववैमनस्यातून युवकावर वार करून निर्घृण खून

एकमेकांकडे पाहण्यावरून झाली होती भांडणे : सिंहगड रोड पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कर्वेनगर येथे एकमेकांकडे पाहण्यावरून पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तिघा अल्पवयीन युवकांनी एका महाविद्यालयीन युवकावर तीक्ष्ण हत्याराने मानेवर, डोक्यावर व पाठीवर वार करून निर्घृण खून केला. सिंहगड रोड पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. करण गिरीश … Read more

म्हाडात सदनिका मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाकडून (म्हाडा) वितरित करण्यात येणारी सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्याने महिलेची १ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रहाटणी येथील एका ३७ वर्षांच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून श्रीकृष्ण वसंतराव तौर उर्फ बाळाराजे पाटील (रा. अरणगाव, ता. परांडा, जि. … Read more

हुंड्याच्या छळामुळे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

लोणीकंदमधील घटना : आयटी इंजिनिअर पतीसह चौघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुण्यात नोकरी करणाऱ्या आयटी इंजिनिअर मुलाचे स्थळ पाहून मुलीच्या वडिलांनी आपली जमीन विकून मुलीचे थाटामाटात लग्न लावून दिले. लग्नाअगोदर फर्निचरसाठी २ लाख रुपये दिले. लग्नानंतर कारसाठी ५ लाख रुपये दिले. असे असतानाही घराच्या इंटेरियरसाठी माहेरहून २० लाख रुपये आणावेत, यासाठी होणाऱ्या … Read more