आवृत्ती , पुणे

जैन अल्पसंख्याक महामंडळाच्या कामकाजाला गती देणार : उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार

सह्याद्री अतिथीगृह येथे उच्चस्तरीय आढावा बैठक; शिक्षण, वसतिगृह व ‘विहारधाम’ योजनांना गती महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जैन समाजाच्या सर्वांगीण सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचा ठाम संदेश देत, जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या कामकाजाला गती देण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. ही बैठक उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्यांक मंत्री सुनेत्राताई … Read more

फुलचंद पानात नशेसाठी मादक पदार्थांची वाहतूक करणारा जेरबंद

शिवाजीनगर पोलिसांची कारवाई : साडेतीन लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : फुलचंद पानामध्ये नशेसाठी अनेक ठिकाणी मादक पदार्थांचा वापर होऊ लागला आहे. असा मादक पदार्थ विक्रीसाठी आणलेल्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. विष्णु रामरतन गुप्ता (रा. पिंपरी-चिंचवड) असे या आरोपीचे नाव आहे. मोटार टेम्पोमध्ये ३ लाख ३८ हजार ८८० रुपयांच्या बंट्याच्या गोळ्यांची … Read more

तोतया पोलिसाने नोकरीच्या अमिषाने घातला गंडा

महापालिकेत नोकरीचा बहाणा : दागिने गहाण ठेवून दिले ५ लाख रुपये महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हडपसर पोलीस ठाणे, युनिट ५ मध्ये पोलीस अधिकारी असल्याचे सांगून नातीला महापालिकेच्या जन्म-मृत्यू खात्यात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून एका तोतयाने महिलेची ५ लाख रुपयांची फसवणूक केली. केतन दादासाहेब साळुंखे (वय ४०, रा. कुशल वाटिका सोसायटी, लोणी काळभोर) असे या … Read more

व्यावसायिकाच्या कार्यालयातून दहा लाखांची रोकड चोरी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्यावसायिकाच्या कार्यालयातील कामगाराने १० लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कामगाराविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दिलीप पुखराज ओसवाल (वय ५७, रा. वर्धमानपुरा, गंगाधाम चौक) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अखिलेश बसंतलाल वर्मा (रा. पुरोह, प्रयागराज, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा … Read more

सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू

वेदविहार सोसायटीचे चेअरमनसह कार्यकारिणी सदस्यांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सोसायटीच्या आवारात बसविण्यासाठी आणलेली लोखंडी घसरगुंडी डोक्यावर पडून बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना हडपसरमधील मगरपट्टा भागात घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी हडपसर पोलिसांकडून सोसायटीतील अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अनिका नवनाथ देवीकर (वय साडेचार वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. याबाबत तिचे … Read more