आवृत्ती , पुणे

निवडणुकांत अधिकाऱ्यांनी चोखपणे कर्तव्य बजावावे : डॉ. सुहास दिवसे

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी जिल्हा प्रशासनाने चांगले काम केले असून, त्याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी सर्वांनी दक्ष राहून चोखपणे कर्तव्य बजावावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी … Read more

महिला सशक्तीकरणासाठी कस्तुरबा महिला ग्रुपचे योगदान महत्त्वाचे

माधुरी मिसाळ : वर्धमान सांस्कृतिक केंद्रात एक्झिबिशनचे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर, 1949 साली शांताबाई रायसोनी, सुलभा चोरडिया, कुंदनबाई बाफना यांनी महिला सशक्तीकरणासाठी कस्तुरबा महिला ग्रुपची स्थापना केली. हा ग्रुप आजही महिला सशक्तीकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले. प्रमिलाबाई सांकला अध्यक्ष असलेल्या कस्तुरबा … Read more

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनला ‘अ’ श्रेणी

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया : शिक्षण देण्यावर ‘सूर्यदत्त’चा भर महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनला (एसआयएमएमसी) राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेने (नॅक) शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनात ‘अ’ श्रेणी प्रदान केली आहे. या प्रतिष्ठित संस्थेकडून मिळालेल्या मान्यतेमुळे सूर्यदत्तची शिक्षणातील उत्कृष्टतेसाठीची वचनबद्धता आणि गुणवत्ता मानके उंचावण्याचे सातत्यपूर्ण … Read more

भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील वृद्धाचा मृत्यू

लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तुळापूर ते फुलगाव रस्त्यावर भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात १८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. या अपघातात लक्ष्मण मुंजाजी काळे (वय ७२ वर्षे, रा. सैनीकी शाळेसमोर, फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे) हे ठार झाले. पोलिसांनी टेम्पो चालक मराबाबा काळे … Read more

लायन्स क्लब बार्शीच्या वतीने शिक्षकरत्न पुरस्काराचे थाटात वितरण

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : लायन्स क्लब बार्शीच्या वतीने यावर्षीचा शिक्षक रत्न पुरस्कार शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. पंडित लावंड , शिवव्याख्याते प्रा. विशाल गरड, प्रा. बालाजी राऊत, मधुकर जाधव, सुधीर खाडे, अनिकेत कारंडे, सुरेशआबा राऊत, आनंद धुमाळ यांना प्रदान करण्यात आला. बार्शीचे माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी व लायन्स इंटरनॅशनल चे लिओ प्रांतीय सभापती ॲड विकास जाधव … Read more

बार्शीत पैगंम्बर जयंतीदिनी जुलूसमध्ये मिठाई वाटप

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : मोहम्मद पैगंम्बर जयंतीदिनी हजरत टिपू सुलतान फाउंडेशनच्या व इलियास भाई शेख मित्र मंडळ च्या वतीने पैगंबर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जुलूसमध्ये मिठाई वाटप करण्यात आले. मोहम्मद पैगंम्बर यांची जयंती ही पूर्ण जगात उत्साहपुर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी केली जाते. विविध सामाजिक उपक्रम गरिबांना अन्नादान, खाऊ वाटप व गरजुंना मदत … Read more

महाराष्ट्र विद्यालयाच्या योगपटूचे क्रीडा स्पर्धेत यश

जिल्हास्तरीय योगासन स्पर्धाचे न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा याठिकाणी आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : महाराष्ट्र विद्यालयाच्या तर्फे आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील ५५ खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विद्यालयाची योगपटू श्रेया कैलास करळे हीने तृतीय क्रमांक मिळवत उज्वल यश संपादन केले. श्रेयाची शालेय योगासन स्पर्धेत पुणे विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे. या सर्व स्पर्धा शिवशक्ती … Read more

एनपीएस वात्सल्य योजनेच्या नोंदणीस पुण्यात सुरुवात

संतोष पाटील : एनपीएस मुळे मुलांचे भविष्य सुरक्षित होईल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. दिल्ली येथील या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पुणे येथे करण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाव्यवस्थापक तथा … Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाअंतर्गत जिजाऊ पर्यटन केंद्र, चिंचवड येथील गणेशमूर्ती विसर्जन कुंडावर विशेष निर्माल्य संकलन मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमेस शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छतेची शपथ ग्रहण केली. आणि शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संकल्पही केला. आम्ही शपथ घेतो की, आम्ही स्वत: स्वच्छतेच्या बाबतीत … Read more

जागतिक वारसा नामांकनासाठी गणेशोत्सव मिरवणुकीत जनजागृती

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचा पुढाकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड किल्ल्यांचे जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या पुढाकाराने पुणे शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीत आकर्षक जागतिक वारसा रथाद्वारे अलका सिनेमागृह चौकात जनजागृती करण्यात आली. यावेळी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे, … Read more