आवृत्ती , पुणे

अक्कलकोटे परिवाराच्या वतीने कार्डियाक ॲम्बुलन्स लोकार्पण

कै. हरिभाऊ अक्कलकोटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त बार्शी ट्रस्टला २१ सप्टेंबर रोजी देणार भेट पवन श्रीश्रीमाळ बार्शी : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : कै. हरिभाऊ अक्कलकोटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त २१ सप्टेंबर रोजी अक्कलकोटे परिवाराच्या वतीने १७वा पुट्ठा रोडगा रस्ता, बार्शी ट्रस्टला कार्डियाक ॲम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी सांगितले. कै. हरिभाऊ अक्कलकोटे … Read more

‘आयसीएमआर’च्या नियमांचे पालन करूनच डॉ. अंधारे यांच्याकडून कोरोना रुग्णांवर उपचार

शासकीय समितीचा स्पष्ट अहवाल : ‘आयएमए’ डॉ. अंधारे यांच्या पाठीशी बार्शी :पवन श्रीश्रीमाळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सुश्रुत हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. संजय अंधारे यांनी कोविड साथीच्या आपत्तीकाळातील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच कोविडग्रस्तांवर उपचार केले आहेत, असा स्पष्ट अहवाल या संदर्भात नियुक्त शासकीय समितीने दिला आहे. डॉ. अंधारे यांच्यासारख्या समर्पित भावनेने … Read more

लहान मुले उद्याचे वाहनचालक असल्याने त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत

जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख : वाहतूक नियम जनजागृती प्रबोधन कार्यक्रम पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क आपले मन व्यवस्थित असेल तर वाहन व्यवस्थित राहील. डोळे-कान दोन्ही इंद्रियांचा योग्य वापर करून वाहन चालविले तर अपघात होणार नाहीत. लहान मुले उद्याची वाहनचालक आहेत, त्यांच्यावर पालकांनी चांगले संस्कार करण्याची गरज आहे. महिलांनी स्वसंरक्षणाविषयी स्वतः दक्षता घेतली पाहिजे, असे … Read more

गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर रोडवर आता दोन्ही बाजूंस ‘नो पार्किंग’

तात्पुरत्या स्वरुपात आदेश निर्गमित : ४ सप्टेंबरपर्यंत मागवल्या सूचना महाराष्ट्र ३६० न्यूज स्वारगेट वाहतूक विभाग पुणे अंतर्गत, गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर रोडवर आईमाता मंदिरापर्यंत दोन्ही बाजूंस नो पार्किंग करण्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरुपात आदेश निर्गमित करण्यात आला असून, याबाबत ४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया समाविष्ट करणार

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आश्वासन : एच. व्ही. देसाई नेत्ररुग्णालयास भेट महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. एच. व्ही. देसाई नेत्ररुग्णालयास भेट देऊन रुग्णालयाच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी हे आश्वासन दिले. पुणे अंधजन मंडळाचे एच. व्ही. देसाई नेत्ररुग्णालय मागील २० … Read more

बार्शी शहरात बेशिस्त वाहनचालकांवर बसणार चाप

पोलिसी दंडुका दाखवून शिस्त लावणार असल्याचा नूतन पोलीस निरीक्षक शेळके यांचा इशारा पवन श्रीश्रीमाळ महाराष्ट्र ३६० न्यूज बार्शी : मराठवाड्याचे प्रवेशद्वार आणि भगवंताची नगरी असलेले बार्शी शहर हे शैक्षणिक व वैद्यकिय क्षेत्रातील प्रगत शहर आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्याबरोबरच बेशिस्त वाहनधारक व वाहनचालकांना पोलीस दंडुका दाखवून शिस्त लावणार असल्याचा इशारा नूतन पोलीस निरीक्षक रामदास शेळके … Read more

रामदास शेळके यांनी स्वीकारला प्रभारी पोलीस निरीक्षकाचा प्रभार

बार्शी शहर पोलीस ठाणे : मावळते निरीक्षक संतोष गिरीगोसावींकडून सूत्रे ताब्यात पवन श्रीश्रीमाळ महाराष्ट्र ३६० न्यूज बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची सोलापूर पोलीस मुख्यालयात नियंत्रण कक्षात बदली झाली असून, गुरुवारी (ता. 19) सकाळी नूतन प्रभारी पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी गिरीगोसावी यांच्या कढून पदभार स्वीकारला. गिरीगोसावी यांनी शहर … Read more

भुसार व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी महेश बाफणा यांची बिनविरोध निवड

बार्शी : पवन श्रीश्रीमाळमहाराष्ट्र ३६० न्यूज बार्शी : बार्शी किराणा व भुसार व्यापारी संघ बार्शी या संघटनेच्या अध्यक्षपदी महेश बाफणा यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक यश लॉन्स येथे पार पडली. या बैठकीत ही निवड करण्यात आली. या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष शैलेश शेलार, सचिव … Read more

सॅनिटरी नॅपकिन, व्हेंडिंग मशिन, इन्सिनरेटर मशीनचे वाटप

लिओ क्लब ऑफ बार्शीचा उपक्रम : रक्षाबंधन निमित्त महिलांमध्ये जागृती महाराष्ट्र ३६० न्यूज बार्शी : रक्षा बंधनच्या पार्श्वभूमीवर लिओ क्लब बार्शी टाऊनच्या वतीने महिला व मुलींना सॅनिटरी नॅपकिन, व्हेडींग मशिन व इन्सिनरेटर (डिस्पोझल) मशिन वाटप करण्यात आले. तरूणींमध्ये सॅनिटरी पॅड वापर व डिस्पोझल बद्दल जनजागृती होण्यासाठी बार्शीच्या लिओ क्लबने हा सामाजिक उपक्रम राबवला. यावेळी नर्सिंगचे … Read more

डी.सी.सी. कंपनीकडून 150 रेनकोटचे वाटप

कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्यातील अधिकारी-अंमलदार यांना वितरण पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क डेक्कन पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कार्यरत असलेली डाटा केअर कार्पोरेशन (डी.सी.सी.) या कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी, अंमलदार यांना 150 रेनकोटचे वाटप करण्यात आले. या वेळी डी.सी.सी. कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांनी पोलिसांशी … Read more