तात्पुरत्या स्वरुपात आदेश निर्गमित : ४ सप्टेंबरपर्यंत मागवल्या सूचना
महाराष्ट्र ३६० न्यूज
स्वारगेट वाहतूक विभाग पुणे अंतर्गत, गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर रोडवर आईमाता मंदिरापर्यंत दोन्ही बाजूंस नो पार्किंग करण्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरुपात आदेश निर्गमित करण्यात आला असून, याबाबत ४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत.
०१९६/८७१/सीआर ३७/टीआरए २, दिनांक २७/०९/१९९६ च्या नोटीफिकेशननुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) - (ए) (बी), ११६(४) आणि ११७ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून पुणे शहराच्या वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उप-आयुक्त राहुल श्रीरामे यांनी तात्पुरत्या स्वरूपात याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. नागरिकांनी याबाबत आपल्या काही सूचना असल्यास त्या पोलीस उप-आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला नं ६, येरवडा पोस्ट ऑफीस जवळ, पुणे - ४११०६ यांच्या कार्यालयात दिनांक २१/०८/२०२१ ते दिनांक ०४/०९/२०२१ पर्यंत लेखी स्वरूपात कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सूचना व हरकती विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका, इ.) खेरीज करून अंतिम आदेश काढण्यात येतील. सदर ठिकाणी या कार्यालयाकडून यापूर्वी निर्बंध घालण्यात आले असतील, तर ते रद्द समजण्यात येतील, असे उप-आयुक्त राहुल श्रीरामे यांनी कळविले आहे.
