आवृत्ती पुणे

शिवसेनेच्या उमेदवाराचा त्यांच्या पक्षाच्याच उमेदवाराने गिळला एबी फॉर्म

पक्षाची उमेदवारी मिळाली नाही, उलट शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आपल्याला एबी फॉर्म दिला असतानाही पक्षाने दुसऱ्यालाही आणखी एक एबी फॉर्म दिल्याचे पाहून शिवसेनेच्या एका उमेदवाराने आपल्या पक्षाच्याच उमेदवाराचा एबी फॉर्म चक्क चावून गिळला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही; उलट पोलिसांनी त्यांच्यावर शासकीय … Read more

तरुणाच्या डोक्यात दगड घालून लोखंडी रॉडने मारून निर्घृण खून

पूर्ववैमनस्यातून कृत्य, फुरसुंगी पोलिसांनी दोघांना केली अटक, अल्पवयीन मुलगा ताब्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दोन-अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तिघांनी तरुणाला गाडीत घालून मोकळ्या मैदानात नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून व लोखंडी रॉडने मारहाण करून निर्घुण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. फुरसुंगी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. … Read more

सराईत गुंडांकडून पोलीस हवालदाराला मारहाण

वाहनांवर केलेल्या दंडात्मक कारवाईच्या रागातून कानाखाली मारहाण : तिघांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ट्रिपल सीट जात असताना गाडी अडवून दंडात्मक कारवाई केल्याच्या कारणावरून चौघा गुंडांनी वाहतूक पोलीस हवालदाराला धक्काबुक्की करून कानाखाली मारहाण करत त्यांचा गणवेश फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत नर्‍हे पोलिसांनी तिघा गुंडांवर कारवाई केली आहे. लकी गौरव आनंद (वय २१), … Read more

जमीन वाटप पत्राच्या निकालाची प्रत देण्यासाठी मागितली १ लाखांची लाच

जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागातील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी महिलेवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वडिलोपार्जित जमिनीच्या झालेल्या वाटपपत्राच्या नोंदीबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाची केवळ प्रत देण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ ३० रुपये भरून ज्या निकालाची प्रत मिळू शकते, त्यासाठी ही महिला उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्यासाठी १ लाख रुपयांची … Read more

खानापूर सराफ दुकानावर दरोडा टाकणारे सराईत गुन्हेगार जेरबंद

ग्रामीण पोलिसांनी सिंगापूरच्या जंगलातून ४८ तासांत केली अटक, ७० लाखांचे ५६ तोळे दागिने जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खानापूर येथील सराफ दुकानात शस्त्राचा धाक दाखवून तब्बल १ कोटी रुपयांचे ८४ ग्रॅम सोन्याचे दागिने लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांना पुणे ग्रामीण पोलिसांनी सिंगापूरच्या जंगलातून जेरबंद केले. त्यांच्याकडून ७० लाख ३२ हजार रुपयांचे ५६ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत … Read more