शवविच्छेदनासाठी पाठविला मृतदेह : चार-पाच दिवसांपूर्वी खून केल्याचा अंदाज
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : हिंजवडी आयटी पार्क भागात एका तरुणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांनी मुलीचा निर्घृण खून केल्यानंतर तिचा मृतदेह झाडाला लटवकला असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या मुलीची अद्याप ओळख पटलेली नाही.
पोलिसांनी सांगितले की, हिंजवडी आयटी पार्क परिसरातील मुळा- मुठा नदीच्या काठावर एका निर्जनस्थळी हा मृतदेह आढळून आला. मयत मुलीचा चार ते पाच आठवड्यांपूर्वी निर्घृण खून करण्यात आला असावा. त्यानंतर मुलीचा मृतदेह झाडाला लटकवला अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदन आणि डीएनए टेस्टसाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बेपत्ता लोकांची माहिती मिळणे आवश्यक आहे. जर एखादी मुलगी किंवा महिला बेपत्ता असेल, तर तिच्या नातेवाईकांनी पुढे येऊन माहिती पोलिसांना द्यावी. यामुळे मृतदेहाची ओळख पटवण्यात मदत होईल. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पुढील उलगडा होईल.
