देहू रोड पोलीस ठाण्यात फिर्याद : आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पतीनेच एका महिलेला वेश्या व्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या सासू, सासरे, मामी, जाऊ, दीर, पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संभाजी चौक, पाषाण याठिकाणी 8 डिसेंबर 2020 ते 16 जानेवारी 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी (दि.30) देहू रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानुसार पोलिसांनी 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पतीला मधुमेह असल्याची माहिती लग्न जमवताना मध्यस्थी असलेल्या मामा आणि मामीने लपवून ठेवली. लग्नानंतर पतीच्या मधुमेहाच्या उपचारासाठी माहेराहून पैसे आणण्यासाठी सासू सासऱ्यांनी महिलेला दमदाटी करुन शिवीगाळ करत मारहाण केली. पतीला मधुमेह असल्याची माहिती लपवून का ठेवली, अशी विचारणा फिर्यादी महिलेने मामा आणि मामीकडे केले. त्यावेळी मामा, मामी आणि जाऊ यांनी फिर्यादी महिलेस शिवीगाळ केली. तसेच मामी, दीर आणि एका व्यक्तीने फिर्यादीसमोर कमी कपडे घालून तिच्यासमोर गैरवर्तन करत विनयभंग केला.
आरोपी पतीने मधुमेहाच्या औषधोपचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी फिर्यादी यांना पुण्यात वेश्या व्यवसाय चालणाऱ्या बुधवार पेठेत नेले. याठिकाणी फिर्यादी यांना वेश्या व्यवसाय कर म्हणून विचारणा केली. फिर्यादी यांनी नकार दिल्याने पतीने घरी आल्यानंतर फिर्यादी यांच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग केला. तसेच महिलेच्या माहेरच्या लोकांनी दिलेले स्त्रीधन परत न करता फिर्यादी महिलेला घरातून हकलून दिले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.
