डेक्कन पोलिसांत फिर्याद : कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज केला लंपास
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : स्वा. सावरकर स्मारक व अध्यासन केंद्राचे कुलूप तोडून ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना (दि. २ ते ३ मे २०२२) रात्री सव्वा अकरा ते सकाळी साडेआठ दरम्यान डेक्कन येथे घडली.
याप्रकरणी परिलमल कुलकर्णी (वय ४०, रा. सनशाईन सोसायटी, भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे) यांनी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीने डेक्कन पुणे येथील स्वा. सावरकर स्मारक व अध्यासन केंद्र कुलूप लावून बंद केले होते. चोरट्यांनी कडीकोयंडा कापून केंद्रामधील ५५ हजार रुपयांचा डायनाकॉर्ड मिक्सर मशीन व दोन हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सहायक पोलीस निरीक्षक बी. आर. झरेकर पुढील तपास करीत आहेत.