गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमुळे आरोपी सुशांत गायकवाड सहा महिन्यांकरिता हद्दपार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे- येथील मुंढवा पोलिस स्टेशन हद्दीतील आरोपी सुशांत गायकवाड यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाल्याने त्याला सहा महिन्यांकरिता तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
गायकवाडला तडीपार करण्याचा प्रस्ताव मुंढवा पोलिस स्टेशनकडून पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडे पाठवण्यात आला होता. त्याला मान्यता देण्यात आली आहे. सदर कारवाई, परिमंडळ 5 चे पोलिस उप आयुक्त विक्रांत देशमुख यांच्या आदेशान्वये हडपसर विभागाच्या पोलिस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या सुचनेनुसार पोलिस अंमलदार हेमंत झुरुंगे, दीपक कांबळे व इतर कर्मचारी वर्गाने केली.
