महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे- धारदार हत्याराने व लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करून पसार झालेल्या पाच आरोपींना जेरबंद करण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. फुरसुंगी रस्त्यावरून जाणाऱ्या शिवलिंग पांढरे व वैभव गायकवाड यांच्यावर आरोपींनी पाठीमागून हल्ला केला त्यामध्ये वैभव गायकवाड मयत झाले. शिवलिंग पांढरे यांनी नोंदवलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडण्यात हडपसर पोलिसांना यश आले.
सदर गुन्ह्यातील आरोपी प्रतीक कामठे, शुभम गायकवाड, सोन्या पोटे, अनिकेत कटके व स्वराज दोरगे यांची माहिती घेतली असता, गुन्ह्यानंतर ते फरारी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांचे शेवटचे स्थान रावणगाव, खडकी भागातले होते. तपास पथकातील अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस अंमलदार समीर पांडुळे, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, अतुल पंधरकर, अजित मदने यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला होता.
ठोस माहिती मिळत नसल्याने, पुणे- सोलापूर महामार्गावर मिळणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने पोलिसांनी सातत्याने तीन दिवस टेंभुर्णी, कुर्डुवाडी, माढा, वैराग या परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेज आधारे आरोपींची माग काढला. त्यावेळी आरोपी माळवंडी भागात वास्तव्य करून पुन्हा पुण्याच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करत आरोपी प्रतीक कामठे, वय 24 वर्ष, रा. फुरसुंगी, शुभम गायकवाड, वय 21 वर्षे, रा. सदर, आशुतोष उर्फ सोन्या पोटे, वय 21 वर्ष, रा. फुरसुंगी, अनिकेत कटके, वय 19, रा. बेंदवाडी, फुरसुंगी व स्वराज दोरगे, वय 19 वर्षे रा. बेंदवाडी यांना बोरीबेल दौंड इथून ताब्यात घेतले.
मयत वैभव गायकवाड यांच्याबरोबर उरूसामध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून या पाचही जणांनी त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासाअंती चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणी हडपसर पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरिक्षक प्रतापसिंह शेळके पुढील तपास करत आहेत.
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, .सह पोलीस आयुक्त, पुणे शहर संदिप कर्णिक, पुर्व प्रादेशिक विभाग अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, व परिमंडळ ५ पोलीस उप आयुक्त विक्रांत देशमुख यांच्या मागदर्शनाखाली हडपसर विभाग पुणे सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख,. हडपसर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोनि (गुन्हे) पुणे शहर विश्वास डगळे यांच्या सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, अजित मदने, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, सचिन गोरखे, मनोज सुरवसे, अमोल दणके, प्रशांत टोणपे, रशिद शेख, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजीतवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
