पाच घरफोडीचे गुन्हे भारती विद्यापीठ पोलिसांकडून उघड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे- पुण्यातल्या भारती विद्यापीठ परिसरात दिनांक 9 जून रोजी दुपारी साडेबारा ते अडीच वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या राहात्या घराचे कुलुप तोडून, 1 लाख 26 हजार रुपये किंमतीचे दागिने तर सहफिर्यादी च्या घरातून साडे सव्वीस हजाराचे दागिने लंपास केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
या तक्रारीची दखल घेत भारती विद्यापीठ पोलिस कार्यालयातल्या पोलिस अंमलदार चेतन गोरे, निलेश ढमढेरे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, अवधूत जमदाडे यांनी कसून शोध घेत सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून अशा प्रकारच्या पाच घरफोड्यांचे गुन्हे उघड झाले आहेत.
अमीर समीर पठाण उर्फ लकी, वय 24 वर्षे, रा. कात्रज याने हा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी, दिवसभर शहरात फिरून बंद घरे हेरत असे, या घरांची कुलुपे तोडून सोने, चांदीचे दागिने लंपास करत असे. आरोपीवर पुणे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत एकूण नऊ चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पश्चिम प्रादेशिक विभाग, अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ दोन च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, स्वारगेट विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठी पोलिस स्टेशन मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धीरज गुप्ता, गौरव देव, पोलीस अंमलदार अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, सचिन सरपाले, शैलेश साठे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, निलेश खैरमोडे, राहुल तांचे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.
