महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: संपूर्ण जगाला स्वस्थ आणि आरोग्यमय जीवनाचा मार्ग दाखवणारा योग हा भारताच्या प्राचीनता आणि विविधतेचे प्रतीक आहे. शारीरिक क्षमता, बौद्धिक पातळी वाढवण्यासह आत्मिक समाधान देणारी अमूल्य नैसर्गिक भेट भारताने जगाला दिली आहे. जागतिक योग दिनानिमित्त पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवरामपंत दामले प्रशाले (कटारिया हायस्कूल) येथे भव्य योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रवीण चोरबेले, मानसी देशपांडे, श्रीकांत जगताप, जितेंद्र पोळेकर, आनंद रिठे, मनोज देशपांडे, उद्योगपती प्रशांत टाटिया, रघुनाथ गौडा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
