फरासखाना पोलिसांची कामगीरी : दुचाकीच्या डिक्कीतुन चोरी झालेले मंगळसूत्र केले हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्युज
पुणे : लक्ष्मी रोड या गजबजलेल्या परिसरात दुचाकीच्या डिक्कीतील सोन्याचे मंगळसूत्र चोरी करणारा सराईत चोरटा बाबा लक्ष्मण बनपट्टे (रा. ८८३ वडारवाडी मारुती मंदीर जवळ, मॉडेल कॉलनी, पुणे) याला
फरासखाना पोलीसांनी अवघ्या एका तासात अटक केली आणि चोरी केलेले मंगळसूत्र हस्तगत कले.
१५ ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास बुधवार पेठेतील विजयराज लॉज समोर फिर्यादीने आपली दुचाकी उभी केली होती. त्यांच्या पत्नीचे ११ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र दुरुस्त करून घेतल्यानंतर ते त्यांच्या ज्युपीटरच्या डिक्कीमध्ये ठेवले होते. मुलीला कपडे घेण्यासाठी ते तुळशीबागेत गेले आणि हा चोरीचा प्रकार घडला होता. ते परत आले तेंव्हा कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या गाडीच्या डिक्की मधून मंगळसूत्र चोरून नेल्याचे निदर्शनास आले होते. या चोरीची फिर्याद दाखल करताच फरासखाना पोलिसांनी अज्ञात इसमा विरुध्द गुन्हा नोंदवला होता.
फरासखाना पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग हे शोध घेत असताना त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप कांबळे, समीर माळवदकर, अभिनय चौधरी यांना रेकॉर्डवरील आरोपी बाबा लक्ष्मण बनपट्टे यानेच हि चोरी केली असल्याची माहीती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरून प्राप्त झाली. मनोज अभंग यांनी तपास पथकाच्या सहकार्याने बाबा लक्ष्मण बनपट्टे याचा शोध घेत असताना १६ ऑगस्टला आरोपी बनपट्टे हा बुधवार पेठेतील बाटागल्लीत सापडताच त्याला अटक करण्यात आली. पोलिसी हिसका दाखवताच चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र तासाभरात हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. आरोपी हा पुणे शहर आयुक्तालय हृदीतील सराईत भामटयाचोर असुन त्याचेवर या पूर्वीदेखील अनेक गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अजितकुमार पाटील हे करीत आहेत.
सदरची कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, पुणे पश्चिम प्रादेशिक विभाग अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे , पोलीस उप आयुक्त डॉ प्रियंक नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग, पोलीस उप निरीक्षक अजितकुमार पाटील, व पोलीस अमलदार समीर माळवदकर, संदीप कांबळे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, महावीर वलटे, राकेश क्षीरसागर, ऋषीकेश दिघे, अभिनय चौधरी, वैभव स्वामी मोहन दळवी, गणेश आटोळे यांच्या पथकाने केली आहे.
