लोणीकंद पोलीसांची कामगीरी : मयूर शिंदेला केली अटक
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : खूनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या गुन्हेगारास सिनेस्टाईलने पाठलाग करून अटक करण्यात लोणीकंद पोलिसांना यश आले.
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला आणि फरारी आरोपी मयुर शिंदेचा शोध घेणारे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सुरज गोरे आणि त्यांचे पथक लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत गस्तीवर असताना पोलीस नाईक कैलास साळुंखे व विनायक साळवे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत शिंदेंची माहिती मिळाली होती. तीन महिन्यापुर्वी खुनाच्या प्रयत्नामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामधील आरोपी मयुर शिंदे हा केसनंद फाटा वाघोली येथे बस स्टॉपजवळ थांबला असल्याची माहिती बातमीदाराने दिली. मिळालेल्या माहितीवरुन वरिष्ठांचे मार्गदर्शनाखली तपास पथक पी.एम.टी. बस स्टॉपजवळ पोहचले. चाहूल लागताच शिंदेने धूम ठोकली. तपास पथकाने सिनेस्टाईलने पाठलाग करून शिंदेला पकडून त्याची झडती घेतली. त्याचे पाठीमागे पॅंटमध्ये खोवलेला एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी शिंदे व त्याचे साथीदार अभिजीत कांबळे, मयुर नेटके (रा. मांजरी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी ८ मे २०२१ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी मयूर ज्ञानेश्वर पारधे उर्फ शिंदे यांचे सांगणेवरून त्याच्या साथीदारांनी मांजरी खुर्द स्मशानभूमीजवळ आशिष बाळासाहेब उद्रे (रा. मांजरी खुर्द) याचेवर पूर्वीच्या वादाचे कारणावरून कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तेंव्हापासून आरोपी मयुर पारघे उर्फ शिंदे हा फरार होता. त्याला त्या गुन्ह्यात अटक केल्यांनंतर पोलीस कस्टडी मिळालेली आहे. पुढील तपास तपास पथक प्रभारी सुरज गोरे करीत आहेत.
पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख, सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पो. निरिक्षक गजानन पवार, पोलिस निरिक्षक (गुन्हे) राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सुरज किरण गोरे, सफी मोहन वाळके, अजित फरादे, कैलास साळुंके, विनायक साळवे, समीर पिलाणे, सागर कडु, बाळासाहेब तनपुरे यांनी केलेली आहे.
