गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई : वाहनचोरी, दरोडे, गोळीबार करणारा जेरबंद
महाराष्ट्र ३६० न्यूज :
पुणे : शिवणे गावात गोळीबार करून फरारी झालेल्या सराईत गुन्हेगार कार्तिक इंगवलेला अटक युनिट ६ चे पोलीस पथक गस्तीवर असताना ऋषिकेश ताकवणे व ऋषिकेश व्यवहारे यांना त्यांच्या बातमीदाराने कार्तीक इंगवले हा नाशिक फाटा येथे येणार असल्याची माहिती दिली होती.
या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट ६ पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक फाटा येथे सापळा रचून कार्तिक संजय इंगवले (वय १८, रा. बापुजी बुवा चौक, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे) यास ताब्यात घेतले. काही दिवसापूर्वी उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत शिवणे गावामध्ये कार्तीकने गोळीबार करून तो फरारी झाला होता. सराईत गुन्हेगार निलेश गायकवाड याच्या टोळीशी सलग्न असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आठवड्यापुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून कार्तीकने शिवणे स्मशानभुमी परिसरात त्याच्या साथीदारासह केदार भालशंकर याच्यावार गोळीबार केला होता. तपासकामी उत्तमनगर पोलीस स्टेशनने आर्म अॅक्ट ३ (२५) महा.पो.का.क. ३७(१) (३) १३५, क्रिमी अॅम अॅक्ट ७ अन्वये दाखल असलेल्या गुन्हयाचे तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपीस वाहनचोरी व दरोडा प्रकरणी पथक-१ यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनकडे आर्म अॅक्ट ३(२५), ४ (२५), ३० या गुन्हयात देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त, लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलिस निरिक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश टिळेकर, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांचे पथकाने केली आहे.