बंडगार्डन पोलीस स्टेशन : पुणे स्टेशन येथील घटना
महाराष्ट्र ३६०न्यूज
पुणे : पुणे स्टेशन येथे प्रवासासाठी आलेल्या एका जेष्ठ महिलेला शिवशाही चालकाने उडवल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना काल दिनांक १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पुणे स्टेशन येथे घडली आहे.
सोलापूर जिह्यातील केगाव येथील महिला ग्यानदा ज्ञानोबा चौगुले वय ६० वर्ष या पुणे स्टेशन येथे प्रवासा दरम्यान आल्या होत्या,यावेळी महिला सौचालयाकडे त्या जात असताना येथे येणाऱ्या शिवशाही बसचालकाने भरधाव वेगाने येऊन त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असून, बसचालक येथून पळून गेला आहे.याबाबत राणी ईगवे यांनी बंडगार्डन पोलीसात तक्रार दिली आहे.
