भवानी पेठेतील बच्चूभाईवाड्यातील प्रकार
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करुन परिसरात आरडाओरडा करुन दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.28) सकाळी सहाच्या सुमारास भवानी पेठेतील बच्चुभाईवाडा येथे घडला आहे.
आरबाज उर्फ बबन शेख (रा. चुडामन ताली चौक, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी मांगुसिंग रामसिंग मांगलिया (वय-45 रा. सह्याद्री नगर, धनकवडी) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शेख याच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आरबाज आणि फिर्यादी मांगलिया हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी हे भवानी पेठेतील बच्चुभाईवाड्यासमोर उभे होते. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आला.
त्याने फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून खिशातील 10 हजार 360 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच फिर्यादी यांचा मोबाईल भींतीवर आपटून फोडला.
त्यानंतर आरोपीने हातातील कोयता हवेत फिरवून आरडाओरडा करुन परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.
