पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
घरकाम करणाऱ्या महिलेने एक लाख १५ हजार रुपयांच्या मंगळसूत्रावर डल्ला मारल्याची फिर्याद कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. ही घटना ढोले पाटील रोडवरील बाळकृष्ण अपार्टमेंटमध्ये १४ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९ च्या सुमारास घडली होती.
कमल उल्हास ढोले पाटील (वय ६९, रा. ढोले पाटील रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार घरकाम करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिला फिर्यादीकडे मोलकरीन म्हणून काम करत होती. १४ नोव्हेंबर २०२० रोजी फिर्यादीने आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये जाताना एक लाख १५ हजार रुपये किमतीचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बेडरूममधील ड्रेसिंग टेबलवर काढून ठेवून ठेवले. दरम्यान, मोलकरीन महिलेने मंगळसूत्र चोरून नेले अशी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करीत आहेत.
