सोशल मीडियावर कोयते दाखवून पसरविली दहशत : वाघोली आणि रामटेकडी येथून अटक
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोशल मीडियावर हातात घातक हत्यारांसह व्हिडीओ व्हायलर करून दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट सहाकडून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघोली आणि रामटेकडी येथून दोघांना जेरबंद करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर कोयते, तलवार, पालघन अशी घातक हत्यारे हातात घेऊन व्हिडीओ बनवून व्हायरल करून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिलेले होते, त्याअनुषंगाने शुक्रवारी (३ सप्टेंबर) युनिट ६ चे हद्दीत गस्त करत असताना पोलीस शिपाई ताकवणे आणि व्यवहारे यांना माहिती मिळाली की, पालघन हातात घेऊन व्हिडीओ बनूवन ती सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करणारा इसम हा गेरा कन्स्ट्रक्शन, वाघोली येथे बांधकाम साईटच्या मैदानामध्ये येणार आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा युनिट-६) गणेश माने यांना कळविले असता, त्यांनी सदर माहितीची खातरजमा करून माहितीप्रमाणे नमूद ठिकाणी कारवाई करून आरोपी ताब्यात घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून राहुल मलाप्पा चौगुले (वय १९, रा. वाघेश्वर झोपडपट्टी, वाघोली ता. हवेली जि. पुणे), याला ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे पालघन मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आली आहे.
तसेच पोलीस नाईक कारखेले व पोलीस शिपाई टिळेकर यांना माहिती मिळाली की, कोयता हातात घेऊन व्हिडीओ बनूवन तो सोशल मिडीयावर व्हायरल करून दहशत पसरविणारा इसम हा रामटेकडी, हडपसर येथे फिरत आहे. याबाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा युनिट-६) गणेश माने यांना कळवून त्यांनी नमुद ठिकाणी कारवाई करून आरोपी ताब्यात घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी पोलीस नाईक कारखेले, लाहीगुडे, पोलीस शिपाई टिळेकर, काटे असे सापळा रचून रोहन अनिल देडगे, (वय २४, रा. रामटेकडी, वानवडी, पुणे) याला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे कोयता मिळून आल्याने त्याच्याविरुध्द वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आली आहे.
सदर कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे (अतिरिक्त कार्यभार) भाग्यश्री नवटके, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट, ६चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहपोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अंमलदार मच्छिंद्र वाळके, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, संजीव कळंबे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, प्रतीक लाहिगुडे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, नितीन धाडगे, शेखर काटे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.















