गुन्हे शाखा युनिट सहा : गावठी पिस्टल, जिवंत काडतुसासह तीस हजारांचा मुद्देमाल जप्त
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
दहशत माजविण्याकरिता गावठी पिस्टल व जिवंत काडतुस बाळगणारा इसम गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहरच्या जाळ्यात सापडला असून, त्याच्याकडून देशी बनावटीचे गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसासह तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शनिवारी (ता. ४ सप्टेंबर) पोलीस नाईक रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, पोलीस शिपाई ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे व सचिन पवार हे युनिट ६ च्या हद्दीत गस्त करत असताना पथकातील पोलीस नाईक रमेश मेमाणे व बाळासाहेब सकटे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सुधीर पुरबे हा रानवारा हॉटेल, वाघोली, पुणे नगर रोडच्या कडेला थांबलेला असून त्याच्याकडे पिस्तुल आहे.
सदर बाबतची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा युनिट-६) गणेश माने यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी रानवारा हॉटेल जवळ, वाघोली येथे जाऊन सापळा रचून सुधीर भोला पुरबे, (वय २६, रा. साई सत्यम पार्क, वाघोली) यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकूण ३०,४००/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे (अतिरिक्त कार्यभार), भाग्यश्री नवटके, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट, ६ चे पोलीस निरीक्षक श्री गणेश माने, सपोनि नरेंद्र पाटील, अंमलदार मच्छिंद्र वाळके, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, संजीव कळंबे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, प्रतीक लाहिगुडे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर यांनी केली.















