मोक्का कायद्याअंतर्गत ५१वी कारवाई : आठ हजारांचे विषारी रसायन जप्त
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
अंमली पदार्थ विरोधी पथक-२ गुन्हे शाखेकडून मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करत रासायनीक विषारी ताडीप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एकूण आठ हजारांचे विषारी रसायन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी दोघे फरार आहेत.
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हददीत २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आदित्य कुशन वर्कसचे बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुनील गंगाराम बनसोडे (वय २०, रा. सोरतापवाडी ता. हवेली, जि. पुणे) हा आपल्या कब्जात एकूण २६५ लिटर रासायनीक विषारी ताडी व ताडी बनविण्याचे विषारी रसायन, क्लोरलहाईड्रेट (CH) (मड्डी) व रसायन असा किंमत ८०२५ रुपयांचा प्रोव्हिबिशनचा ऐवज अवैधरित्या विक्रीकरीता व ताडी बनविण्याकरीता जवळ बाळगताना मिळून आला, तसेच ताडीचा अवैध व्यवसाय हा पळुन गेलेला शाहरुख मन्सुरी याचा असल्याने व ताडी बनवीन्याचे रसायन त्यास प्रल्हाद भंडारी रा केशवनगर मुंढवा पुणे व नीलेश विलास बांगर (रा. कुरकुटे वस्ती ,पिंपळगाव ता. आंबेगाव, जि. पुणे) हा होलसेल भावात ताडी बनविण्याचे रसायन पुरवीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याविरुधद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम व महाराष्ट्र विष कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे.
नमुद गुन्हयाचे तपासादरम्यान अटक आरोपी सुनील गंगाराम बनसोडे, शहारुख युसुफ मनसुरी (वय २५, रा. इंदिरानगर, लोणी काळभोर, पुणे) यांनी सदर रासायनिक ताडी बनविण्याचे साहित्य त्यांना आरोपी प्रल्हाद ऊर्फ परेश रंगनाथ भंडारी (रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) हा पुरवीत असल्याचे सांगितल्याने आरोपी प्रल्हाद रंगनाथ भंडारी यास दाखल गुन्ह्यात अटन केले. तपासामध्ये निष्पन्न झाले की तो रासायनिक ताडी बनविण्याकरीता विक्री करीत असलेले बनावट, विषारी व मानवी शरीरावर घातक परिणाम करणारे रासायनिक पदार्थ क्लोरलहाईड्रेट, सॅक्रीन, मड्डी पावडर यीस्ट इत्यादी त्यास यातील पाहिजे आरोपी नीलेश विलास बांगर याच्याकडून सदर रासायनिक पदार्थ होलसेल भावात खरेदी करून त्याची पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी बेकायदेशीर अवैध ताडीविक्री करत असलेल्या लोकांना विक्री करत असे यातील टोळी प्रमुख प्रल्हाद ऊर्फ परंश रंगनाथ भंडारी याच्याविरुधद्ध पुणे शहर व जिल्ह्यात वरीलप्रमाणे रासायनिक ताडीचे साहित्य पुरविणेबाबत एकूण दहा गुन्हे दाखल असून, पाहिजे असलेला आरोपी नीलेश विलास बांगर याच्याविरुध्द पुणे शहर व जिल्हयात वरील प्रमाणे रासायनिक ताडी विक्रीचे सात गुन्हे दाखल आहेत. ते वेळोवेळी वेगवेगळया इसमांना सोबत घेऊन वरील गुन्हे करीत आहे.
आरोपी सुनील गंगाराम बनसोडे, शहारुख युसुफ मनसुरी, हे सध्या नमुद गुन्ह्यामध्ये सध्या न्यायालयीन कस्टडीमध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे न्यायबंदी आहेत व टोळी प्रमुख प्रल्हाद ऊर्फ परंश रंगनाथ भंडारी हा दाखल गुन्हयात पोलीस कस्टडीमध्ये आहे. टोळी सदस्य नीलेश विलास बांगर हा फरार आहे.
नमुद गुन्ह्यातील आरोपी हे टोळी वर्चस्व आणि आर्थिक फायदयासाठी लाखो लोकांच्या मानवी शरीरावर होणाऱ्या घातक परिणामांकडे दुर्लक्ष करून रासायनिक बनावटीची ताडी तयार करून विक्री करणे व रासायनिक ताडी तयार करण्याकरीता लागणारे क्लोरोहाईड्रेड (CH), (मड्डी) व सॅक्रीन ची साठवणूक करून त्याची विक्री करणे, असे संघटित गुन्हे करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून गुन्हयातील आरोपी यांच्यावर यापूर्वी अशाप्रकारचे गुन्हे लोणी काळभोर व हडपसर पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क विभाग येथे एकूण १० गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असल्याने आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदयान्वये कारवाई करण्याबाबत विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अतिरीक्त कार्यभार अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. नमूद प्रस्तावाचे अनुषंगाने नमूद गुन्ह्यातील आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यास मंजुरी दिली. त्याप्रमाणे आरोपीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस हवालदार देशपांडे, बोमादंडी, मयूर सूर्यवंशी, पोलीस नाईक जाचक, साहिल शेख, चेतन गायकवाड, संदीप शेळके, महेश साळुंके, खेवलकर, पोलीस अंमलदार नितीन जगदाळे, अजिम शेख, युवराज कांबळे, योगेश मांढरे व दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने केली आहे. नमूद गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार हे करीत आहेत.
मोक्काअंतर्गत केलेली ५१वी कारवाई
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काअंतर्गत केलेली ही ५१वी कारवाई आहे.
