पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
खडकी रेल्वे स्टेशनसमोरील झोपडपट्टीमध्ये किरकोळ कारणावरून मारामारी झाली. घातक शस्त्राने वार केल्याने एकाचा मृ्त्यू झाला. याप्रकरणी खडकी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अनिल शेलार यांनी फिर्याद दिली असून, अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.
रमजान सैय्यद (वय अंदाजे ३५) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, खडकी रेल्वे स्टेशनसमोरील झोपडपट्टी असून, तेथे किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. भांडणाचे पर्यावसान घातक शस्त्राने डोक्यामध्ये, उजव्या व डाव्या डोळ्यावर वार करण्यापर्यंत गेले. घातक शस्त्राच्या वाराने गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास खडकी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी करीत आहेत.
