येरवड्यातील कंजारभाटवस्तीमधील प्रकार : येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
मी तुला खल्लास करतो… तुझ्यामुळे माझी जिंदगी बरबाद झाली… आज तुझा गेमच करतो.. असे म्हणून हातातील पालघन फिर्यादीस मारली. मात्र, ती त्याने चपळाईने हुकवून घरामध्ये पळून गेला आणि दरवाजा बंद केला. त्यामुळे आरोपीने रागाने घरासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकीवर पेट्रोल टाकून दहशत निर्माण केली. येरवड्यातील कंजारभाटवस्तीमधील श्रीकृष्ण मंदिराजवळ ही घटना घडली.
कुणाल मोरे (वय २५, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीला नशापाण करण्याची सवय असून, दोन दिवसांपूर्वी भांडण झाले. त्यावेळी एका इसमास मारहाण होत असताना मदत केली नसल्याच्या रागातून फिर्यादीच्या दारावर लाथा मारून घराबाहेर बोलावून मी तुला खल्लास करतो… तुझ्यामुळे माझी जिंदगी बरबाद झाली… आज तुझा गेमच करतो.. असे म्हणून हातातील पालघन फिर्यादीस मारली. मात्र, ती त्याने चपळाईने हुकवून घरामध्ये पळून गेला आणि दरवाजा बंद केला. त्यामुळे आरोपीने रागाने घरासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकीवर पेट्रोल टाकून दहशत निर्माण केली.
याप्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत किर्वे करीत आहेत.

















