गुन्हे शाखेच्या युनिट-१ ची कारवाई : एक रॅम्पो चाकू जप्त
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट-१ कासेवाडी (सोनवणे हॉस्पिटल) येथे सापळा रचून जेरबंद केले. त्याच्याकडून एक रॅम्पो चाकू जप्त केला. त्याच्यावर आतापर्यंत १८ गुन्हे दाखल आहेत.
विनायक बंडू कराळे (वय 22, रा. कासेवाडीस पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आर्म ॲक्टनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या युनिट-१चे अधिकारी-कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नाईक अमोल पवार यांना तडीपार गु्न्हेगार कासेवाडी (सोनवणे हॉस्पिटल)येथे उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक रॅम्बो चाकू मिळूनन आला, त्याच्यावर आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपासासाठी खडक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, अशोक माने, शशिकांत दरेकर, तुषार माळवदकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 
			


















