खडक पोलीस स्टेशनची कामगिरी : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याचाही गुन्हा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून घेऊन जाणाऱ्या आणि मोक्कातील फरार सराईत गुन्हेगाराच्या बीडमध्ये जाऊन मुसक्या आवळण्यात खडक पोलीस स्टेशनला यश मिळाले असून त्यास मोक्का आणि पास्को या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे.
दिनांक ११ मार्च २०२१ रोजी सकाळी ११च्या सुमारास जयप्रकाश बालवाडीजवळ काशेवाडी पुणे येथून एका अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेल्या बाबत खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी खडक पोलीस ठाण्याकडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांना त्यांच्याकडील महिलांच्या अत्याचारांच्या गुन्ह्याच्या संदर्भात आढावा घेत असताना सहायक पोलीस निरीक्षक नानासो सावंत यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत बातमी प्राप्त झाली की, साधारण सहा महिन्यांपूर्वी काशेवाडीत अल्पवयीन मुलीस पळवून घेऊन जाणारा इसम कृष्णा बबन लोखंडे (रा. कात्रज, जांभुळवाडी रोड, शनीनगर पुणे) हा शिरसाळ (ता. परळी जि. बीड) या ठिकाणी एका मुलीसोबत राहत आहे.
सदर खात्रीशीर बातमीनुसार सदर आरोपीस बीडमधून ताब्यात घेण्यात आले. त्यास खडक पोलीस ठाणे येथे बालकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पास्को)या गुन्ह्याचे अपराधाखाली अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीचा पूर्वेतिहास पाहता त्याच्यावर भारती विद्यापीठ, सहकारनगर, हडपसर या पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा प्रयत्न, दुपाखत पोहचविणे, नुकसान करणे, दरोडा टाकणे इत्यादी स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, तो हडपसर पोलीस ठाणेकडील गुन्ह्यासह मोक्का गुन्ह्यातून फरार होता.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपआयुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक (गुन्हे) हर्षवर्धन गाडे, सहायक पोलीस निरीक्षक नानासो सावंत, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पवार, पोलीस अंमलदार विकास मते, माया गुजर यांचे पथकाने केली आहे.
