कोंढवा पोलिसांत तक्रार : उंड्री-पिसोळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पद्मावती मंदिरासमोरून उंड्री-पिसोळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात वाहनाची पादचाऱ्याला धडक बसून अपघात झाला. या अपघातात पादचाऱ्याचा मृ्त्यू झाला. ही घटना २३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
पटू यादव (वय १९, रा. धायरी, पुणे) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पद्मावती मंदिरासमोरून उंड्री-पिसोळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पादचाऱ्यास भरधाव अज्ञात वाहनाची धडक बसली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार प्रताप डोईफोडे करीत आहेत.















