पिंपरी-चिंचवडमधील प्रकार : पती-नणंद अटकेत, पाचजणांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या बेडरुमध्ये कॅमेरा लावल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात घडला आहे. यानंतर घरातीलच एका व्यक्तीने बळजबरीने पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पतीने बेडरुमध्ये कॅमेरा लावल्या प्रकरणी आणि पीडित महिलेवर नणंदेच्या पतीने बळजबरी करुन शारीरिक संबंध ठेवल्या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करुन पती आणि नणंदेच्या पतीला अटक केली आहे.
चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय महिलेने याबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन 34 वर्षीय पती आणि 33 वर्षाच्या नणंदेच्या पतीला अटक केली आहे. आरोपी पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्याने पत्नीच्या बेडरुममध्ये कॅमेरा लावला. दरम्यान, पती हा नोकरीसाठी बाहेरगावी असल्याने त्याचा गैरफायदा घेत नणंदेच्या पतीने महिलेवर बळजबरी करुन बलात्कार केला, असे महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.
याबाबत संशय आल्याने पतीने बेडरुमध्ये कॅमेरा लावला. यामध्ये पीडित पत्नीवर बळजबरी करुन घरातीलच व्यक्ती शारीरिक संबंध ठेवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
दरम्यान, सासरच्या व्यक्तींनी फ्लॅट घेण्यासाठी 25 लाखाची मागणी करत महिलेला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. एवढेच नाही तर बलात्काराच्या प्रकारानंतर पती आणि नणंदेच्या पतीने महिलेचा गर्भपात केल्याचे महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.
